आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची चाळिशी पूर्ण केली आहे. 21 मार्च 1978 रोजी मुंबईत राणीचा जन्म झाला. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या राणीचे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध घराणे मुखर्जी आणि समर्थ कुटुंबाशी जवळचे नाते आहे. अभिनेता अजय देवगण नात्याने राणीचा मेहुणा होता. तर अभिनेता उदय चोप्रा तिचा दीर आहे. याशिवाय अनेक सेलिब्रिटी राणीचे नातेवाईक आहेत.
हे आहेत राणीचे नातेवाईक...
शशधर मुखर्जी (काजोलचे आजोबा) आणि रवींद्र मोहन मुखर्जी (राणीचे आजोबा) हे दोघे सख्ख्ये भाऊ होते. या नात्याने शशधर मुखर्जींचा मुलगा सोमू मुखर्जी (काजोलचे वडील) आणि रवींद्र मोहन मुखर्जी यांचा मुलगा राम मुखर्जी (राणीचे वडील) हे दोघे चुलत भाऊ आहेत. शशधर मुखर्जी यांचा जॉय मुखर्जी, देब मुखर्जी, सोमू मुखर्जी, रोनू मुखर्जी आणि सुबीर मुखर्जी ही पाच मुले आहेत. तर रवींद्रमोहन मुखर्जी यांचे राम मुखर्जी हे एकमेव चिरंजीव. जॉय मुखर्जी, देब मुखर्जी, सोमू मुखर्जी, रोनू मुखर्जी आणि सुबीर मुखर्जी, राम मुखर्जी हे चुलत भाऊ आहेत.
मेहुणा-मेहुणीचे नाते...
राणी मुखर्जी आणि अजय देवगणचे मेहुणा-मेहुणीचे नाते आहे. अजयचे लग्न काजोलसोबत झाले आहे. राणी आणि काजोल या दोघी चुलत बहिणी आहेत. राणी आणि काजोलचे वडील अर्थातच राम मुखर्जी आणि सोमू मुखर्जी हे चुलत भाऊ आहेत. दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर हेदेखील नात्याने राणीचे मेहुणे आहेत. आशुतोष गोवारिकरांची पत्नी सुनीता दिग्दर्सक अयान मुखर्जीची सख्खी बहीण आहे. अयान आणि सुनीता हे दोघे देब मुखर्जींची मुले आहेत. देब नात्याने राणीचे वडील राम मुखर्जींचे चुलत भाऊ आहेत.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, राणीच्या इतर नातेवाईकांविषयी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.