आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 वर्षांची झाली राणी मुखर्जीची लाडकी लेक, मुलीने लाइमलाइटपासून दूर राहावे वडिलांची इच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राणी मुखर्जी आणि निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांची लाडकी लेक आदिरा हिचा आज वाढदिवस असून ती दोन वर्षांची झाली आहे. आदिराचा जन्म 9 डिसेंबर 2015 रोजी झाला. आदित्य आपल्या लाडक्या लेकीला कायम लाइमलाइटपासून दूर ठेवतात. याच कारणामुळे आदिरा इतर स्टार किड्सच्या तुलनेत अगदी क्वचितच कॅमे-यासमोर दिसले. आदिरा एक वर्षांची झाल्यानंतर तिचा पहिला फोटो समोर आला होता. यावेळी ती आई राणीसोबत दिसली होती. यशराज फिल्म्सच्या ऑफिशिअल पेजवर हा फोटो पोस्ट करण्यात आला होता. या फोटोसोबत राणीने मुलीसाठी एक इमोशनल पोस्ट लिहिली होती. 

 

2014 मध्ये झाले होते राणी-आदित्यचे लग्न... 

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनी 21 एप्रिल 2014 रोजी इटलीत गुपचुप लग्न थाटले होते. त्यानंतर 9 डिसेंबर 2015 रोजी राणीने आदिराला जन्म दिला. आपले खासगी आयुष्य मीडियापासून कायम दूर ठेवणारी राणी आदिराच्या जन्मानंतर सात महिन्यांनी एअरपोर्टवर दिसली होती. जुलै 2016 मध्ये जेव्हा राणी कॅमे-यात कैद झाली, तेव्हा तिला ओळखणे कठीण झाले होते. मुलीच्या जन्मानंतर राणीचे वजन खूप वाढल्याचे या फोटोवरुन दिले होते. 


पुढील स्लाईड्सवर बघा, आदिराचे आतापर्यंत समोर आलेले Photos....​

बातम्या आणखी आहेत...