आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकावे ते नवलच... नव-याला दररोज शिवीगाळ करते राणी मुखर्जी, हे आहे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री राणी मुखर्जी तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. 'हिचकी' हे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव असून सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याचनिमित्ताने राणीने अलीकडेच नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये राणीने खासगी आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टींचा उलगडा केला. शोमध्ये नेहाने राणीला प्रश्न विचारला की, तुला कधी राग येतो किंवा तू कधी कुणाला शिवीगाळ केली आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना राणी म्हणाली, मी दररोज माझ्या नव-यावर चिडते आणि त्यालाच शिवीगाळ करत असते. खरं तर राणीने हे उत्तर गमतीशीर पद्धतीने दिले. उत्तर दिल्यानंतर राणी दिलखुलास हसली.  खासगी आयुष्याविषयी आणखी काय म्हणाली राणी


शोमध्ये राणी म्हणाली, - आदित्य अतिशय केअरिंग आणि स्वीट पर्न आहे. कधी कधी प्रेमाने मी त्याला शिवीगाळ करत असते. नवरा उत्कृष्ट दिग्दर्शक असल्याचे राणी यावेळी सांगायला मुळीच विसरली नाही.


पुढे वाचा, आदित्य चोप्रासोबत कशी झाली होती राणीची पहिली भेट..  

बातम्या आणखी आहेत...