आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 Photos: राणी मुखर्जीला मिळाली होती पाकच्या राष्ट्रपतींसोबत डिनर करण्याची संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अॅक्ट्रेस राणी मुखर्जी हिने आज वयाची 40 वर्षे पूर्ण केली आहेत. 21 मार्च 1978 रोजी मुंबईत राणीचा जन्म झाला. राणीने तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 1997 साली रिलीज झालेल्या दिग्दर्शक अशोक गायकवाड यांच्या 'राजा की आएगी बरात' या सिनेमाद्वारे केली होती. पण हा राणीचा पहिला सिनेमा नव्हता, हे फार क्वचित लोकांना ठाऊक आहे. बंगाली सिनेमा 'बियेर फूल' हा राणीच्या करिअरमधील पहिला सिनेमा होता. राणीने या सिनेमात लीड अॅक्ट्रेस इंद्राणी हलदरची धाकटी बहीण मिलीची भूमिका वठवली होती.


पाकिस्तानच्या राष्ट्रपतींसोबत डिनर करायची मिळाली होती संधी
2005 साली जेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती परवेज मुशर्रफ भारत भेटीवर आले होते, तेव्हा मनमोहन सिंह यांनी त्यांच्या सन्मानार्थ दिल्लीतील हॉटेल अशोकमध्ये डिनर ठेवले होते. या डिनरला राणी मुखर्जीला आमंत्रित करण्यात आले होते. हे निमंत्रण मिळवणारी राणी एकमेव बॉलिवूड कलाकार होती. या भेटीनंतर पाच महिन्यांनी राणीचा 'वीर जारा' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात राणीने पाकिस्तानी ह्यूमन राइट्स अॅक्टिविस्टची भूमिका साकारली होती. असे म्हटले जाते, की या सिनेमानंतर राणी मुशर्रफ यांच्या पत्नी साहेबा यांची फेव्हरेट अॅक्ट्रेस बनली होती.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, राणी मुखर्जीचे Rare Photos...

बातम्या आणखी आहेत...