आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचे लग्न सध्या चर्चेचा विषय आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे या वर्षीच्या शेवटी विवहबंधनात अडकु शकतात. प्रथम या दोघांच्या मुंबई अथवा बंगळुरु येथे लग्न करण्याच्या चर्चा होत्या पण आता मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे डेस्टीनेशन वेडींग करणार आहेत. हे लग्न सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत होऊ शकते. याअगोदर विराट-अनुष्काने इटलीत डेस्टीनेशन वेडींग केले. रॉयल लग्नाला आहे दीपिका-रणवीरचा विरोध..
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, रणवीर-दीपिका त्यांचे आयुष्य खाजगी ठेवण्यास प्राधान्य देतात त्यामुळे ते रॉयल वेडींग करणार नाहीत. मीडियापासून दूर असे हे लग्न पार पडणार आहे ज्यात फॅमिली आणि जवळचे लोकांच्या समावेश असेल.
भारतात होतील दोन रिसेप्शन...
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर भारतात दोन रिसेप्शन होऊ शकतात त्यातील पहिले मुंबईत तर दुसरे रिसेप्शन बंगळुरु येथे होईल. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही घरांचे सदस्य लग्नाच्या तयारीला लागले आहेत आणि यासाठी वेडींग प्लानरही फिक्स झाला आहे.
पाच वर्षापासून डेट करताय दीपिका-रणवीर..
दीपिका आणि रणवीर गेल्या 5 वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. जोघांची लव्हस्टोरी संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट
'गोलियों की रासलीला : रामलीला'मधून सुरु झाली होती. त्यानंतर दोघांनी 'बाजीराव मस्तानी', पद्मावत या चित्रपटांतही काम केले आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, रणवीर-दीपिकाचे काही खास फोटोज्..
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.