आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: बालपणी असा दिसायचा रणवीर सिंह, स्वतःला म्हणतो 'मम्माज बॉय'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई अंजू आणि बहीण रितिकासोबत चिमुकला रणवीर - Divya Marathi
आई अंजू आणि बहीण रितिकासोबत चिमुकला रणवीर


मुंबईः बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंह याचा आज वाढदिवस आहे. 6 जुलै 1985 या दिवशी मुंबईतील एका सिंधी कुटुंबात रणवीरचा जन्म झाला. रणवीरच्या कुटुंबात त्याचे वडील जगजीत सिंह भवनानी, आई अंजू भवनानी आणि थोरली बहीण रितिका भवनानी आहे. रणवीरचे वडील वांद्र्यातील प्रसिद्ध रिअल स्टेट व्यापारी आहेत. तर आई गृहिणी आहे. रणवीर एक उत्कृष्ट कॉपीराइटर, रॅपर, डान्सर आणि अॅक्टरच नाही तर क्लोजेट डीजेसुद्धा आहे. कुकिंगसुद्धा तो चांगला करतो. तो स्वतःला मम्माज बॉय म्हणतो. रणवीर आज 33 वर्षांचा झाला आहे. एक नजर टाकुया रणवीरच्या आत्तापर्यंतच्या प्रवासावर...

 

बालपणापासूनच आहे फिल्मी...
रणवीरला बालपणी नृत्याची विशेष आवड होती. एकदा एका बर्थडे पार्टीला जात असताना त्याची आजी त्याला म्हणाली होती, तिथे जाऊन डान्स नक्की करशील. आजीचे म्हणणे ऐकत रणवीरने पार्टीत 'चुमा चुमा दे दे' या गाण्यावर ठेका धरला होता. रणवीर अभिनेत्यासोबतच एक चांगला डान्सरसुद्धा आहे. 


शालेय जीवनापासूनच स्टेज परफॉर्मन्स..
शालेय जीवनात असल्यापासूनच रणवीरला स्टेज परफॉर्मन्सची आवड होती. तो नेहमी मोनो अॅक्टिंग करायचा. अनेक पुरस्कारसुद्धा त्याने आपल्या नावी केले होते. 

 

सेलिब्रिटींची करायचा कॉपी...
कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर रणवीर अनेक सेलिब्रिटींच्या सिनेमातील पात्रांची हुबेहुब नकल करत असे.

 

बॉलिवूडमध्ये येण्यासाठी केला स्ट्रगल...
इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी रणवीरला खूप स्ट्रगल करावा लागला. त्याने न्यूयॉर्क बेस्ड अॅड एजन्सीसाठी कॉपीराइटर म्हणून काम केले होते. एका भारतीय जाहिरातीत वापरण्यात आलेले रॅप त्याने स्वतः लिहिले होते. 

 

को-स्टार्सचा आहे लाडका...
आता रणवीर दिग्दर्शकाची पहिली पसंती ठरला आहे. एकदा रणवीरसोबत काम करणारा निर्माता-दिग्दर्शक पुन्हा पुन्हा त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक असतो. संजय लीला भन्साळींनी त्याला पहिले 'रामलीला'मध्ये आणि नंतर 'बाजीराव मस्तानी' आणि आता 'पद्मावती' सिनेमासाठी साइन केले. असाच तो त्याच्या को-स्टार्सचाही लाडका बनला आहे. त्याच्यासोबत काम करण्यास बी टाऊनचे अनेक कलाकार उत्सुक असतात. 

 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, रणवीर सिंहच्या बालपणीची खास छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...