आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीरच्या पॅरेंट्सने दिला डायमंड सेट! मात्र दीपिका अजून लग्नाला तयार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांची लव्हस्टोरी बॉलिवूडमधील हॉट टॉपिक असतो. दीपिका नुकतीच 32 वर्षांची झाली आहे. अशी माहिती आहे की दीपिकाच्या बर्थडे निमित्त रणवीरच्या पॅरेंट्सने तिला डायमंड सेट गिफ्ट केला आहे. एवढेच नाही तर अशाही बातम्या येत आहेत की या महागड्या डायमंड सेटसोबतच दीपिकाला सब्यासाची मुखर्जीने डिझाइन केलेली एक साडीही रणवीरच्या फॅमिलीने दिली आहे. 

 

रणवीर लग्नासाठी तयार, मात्र दीपिकाचा अद्याप होकार नाही... 
- मीडियामध्ये अशाही बातम्या आहेत की रणवीर सिंह लग्नासाठी तयार आहे, मात्र दीपिका पादुकोण सध्याच लग्नाच्या मूडमध्ये नाही. 
- असे म्हटले जाते की दीपिका तिच्या करिअरबद्दल काळजीत आहे. यामुळे ती सध्याच लग्नाचा विचार करत नाही. 

 

साखरपुड्याच्या बातम्या निव्वळ अफवा
- दीपिका आणि रणवीर व्हॅकेशनमध्ये श्रीलंकेत होते. येथेच दीपिकाने तिचा 32वा वाढदिवस साजरा केला होता. याशिवाय अशी चर्चा आहे की कपल हॉलिडेच्या निमित्ताने मालदीव येथे गेले होते आणि त्यांनी येथे साखरपुडा केला. 
- आता अशी माहिती आहे की या जोडीच्या एका खास मित्राने म्हटले आहे,'दीपिका बर्थडेला साखरपुडा का करेल? असे केले तर एक मोठे सेलिब्रेशनला गेस्ट मुकतील. हा गेस्टवर अन्याय होईल.

- फ्रेंडने पुढे एक सवालही उपस्थित केला. दीपिका आणि रणवीरची फिल्म 'पद्मावती' याचे नाव नुकतेच 'पद्मावत' करण्यात आले आहे. चित्रपट एवढ्या वादात अडकलेला असताना दोघे सेलिब्रेशन कसे करतील, असाही सवाल फ्रेंडने उपस्थित केला. 
- डायरेक्टर आणि प्रोड्यूसर संजय लीला भन्साळी एवढे चिंताग्रस्त असल्यामुळे दीपिकाने तिची बर्थडे पार्टीही टाळली, असेही फ्रेंडने सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...