आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट-अनुष्काच्या पावलावर पाऊल ठेवत रणवीर-दीपिका करणार हे काम, मग घेणार 7 फेरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या बॉलिवूडमध्ये रणवीर-दीपिकाच्या लग्नाची चर्चा होत आहे. रणवीर-दीपिका याचवर्षी नोव्हेंबरमध्ये लग्न करु शकतात अशी चर्चा आहे. अनुष्का-विराटनंतर सर्वात हॅपनिंग जोडी म्हणून रणवीर-दीपिकाकडे पाहण्यात येते. आता असे वाटत आहे की लग्नाच्या बाबतीत रणवीर-दीपिका विराट-अनुष्काला फॉलो करताना दिसत आहेत.

 

मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, रणवीर-दीपिका इटलीमध्येच सात फेरे घेणार आहेत. यासोबतच मान्यवर ब्रँडच्या अॅडचे शूटिंगही करणार आहेत. याच ब्रँडसोबत अनुष्का-विराटनेही लग्नापूर्वी अॅड शूट केले होते. या अॅडमध्ये विराट-अनुष्का लग्नाच्या आणाभाका खाताना दिसले होते. 

 

आताच काही दिवसांपूर्वी दीपिका तिच्या आईसोबत मुंबईच्या एका ज्वेलरी शोरुमबाहेर स्पॉट झाली होती. ज्यानंतर अशी चर्चा आहे की दीपिकाने तिच्या लग्नाची शॉपिंग सुरु केली आहे. दीपिका तनिष्क शओरुमबाहेर स्पॉट झाली होती. दीपिकाने या ब्रँडसाठी तिच्या आईसोबत अॅड शूट केले होते. 

 

 दीपिका आणि रणवीरने आतापर्यंत  'गोलियों की रासलीला- रामलीला (2013)', 'बाजीराव मस्तानी (2015)' आणि 'पद्मावत (2017)' या चित्रपटात काम केले आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, शॉपिंगला गेलेल्या दीपिकाचे आईसोबतचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...