आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिंदगी झंड बा... या डायलॉगने फेमस झाला अॅक्टर रवी किशन, एकेकाळी 2 रुपयांच्या वडापाववर काढले दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/पटना: भोजपूरी सिनेसृष्टीचा सुपरस्टार रवी किशनने आज  (17 जुलै) वयाची 47 वर्षे पूर्ण केली आहेत. रवी किशन आज कोट्यवधीश आहे. मात्र एक काळ असा होता, जेव्हा त्याच्याकडे खायलासुद्धा पैसे नसायचे. एका मुलाखतीत स्वतः रवी किशनने हा खुलासा केला. रवी किशन म्हणाला, 1990 साली मी जेव्हा गाव सोडून मुंबईत दाखल झालो, तेव्हा माझ्याकडे खायला पैसे आणि डोक्यावर छत नव्हते. दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी हाती येईल ते काम मी केले. काम मिळाले, तर पोटभर जेवायचो अन्यथा उपाशी पोटी रात्र काढावी लागायची. 

 

दोन रुपयांच्या वडापाव खाऊन केला उदरनिर्वाह..
- रवी किशन सांगतो, जेव्हा मी मुंबईत आलो, तेव्हा माझ्याकडे बसचे तिकिट खरेदी करायलासुद्धा पैसे नव्हते. अनेक किलोमीटर पायी चालावे लागायचे. त्यानंतर मी मिळेल ते काम करणे सुरु केले. 
- थोडे पैसे कमावल्यानंतर मुंबईतील एका चाळीत राहू लागलो. अनेक रात्री मी दोन रुपयांच्या वडापावर काढल्या.  

 

संघर्षानंतर मिळाला 'पितांबर' हा सिनेमा...

- एक वर्ष मुंबईत संघर्ष केल्यानंतर रवी किशनला 1991 साली 'पितांबर' या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. पण दुर्दैवाने हा सिनेमा फ्लॉप ठरला.  

 

काजोल आणि शाहरुखसोबत केले सिनेमात काम...

पितांबर हा सिनेमा फ्लॉप ठरल्यानंतर 1994 साली काजोलसोबत 'उधार की जिंदगी' आणि 1996 साली शाहरुख खानसोबत आर्मी या सिनेमात काम केले. त्यानंतर हळूहळू आयुष्य रुळावर आले.  

 

असे फेमस झाले 'जिंदगी झंड बा...'
- एकदा बिग बॉसमध्ये मी 'जिंदगी झंड बा, फिर भी घमंड बा' हा डायलॉग म्हटला होता. या डायलॉगमागची कहाणी रंजक आहे.
- मी हा डायलॉग 'बिग बॉस 6'च्या एका स्पर्धकाला उद्देशून म्हटला होता. त्यावेळी मी प्रचंड रागात होतो. त्याला मी मारु शकत नव्हतो. त्यामुळे हा डायलॉग बोलून मी माझा राग व्यक्त केला.
- बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर मी पाहिले, की अनेक जणांच्या ओठी हा डायलॉग होता. लोक माझ्या तोंडून हाच डायलॉग पुन्हा पुन्हा ऐकू इच्छित होते.  

 

या प्रमुख भोजपूरी सिनेमांत केले काम...
 सईयां हमार (2003), पंडित जी बताई ना बियाह कब होई (2004), दूल्हा मिलल दिलदार (2005), अब त बनजा सजनवा हमार (2006), राम-बलराम (2009), सत्यमेव जयते (2010), पियवा बडा सतावेला (2011), प्रेम विद्रोही (2012), धुरंधर (2013), पंडित जी बताई ना बियाह कब होई 2 (2015), लव और राजनीति (2016),  शहंशाह (2017)

बातम्या आणखी आहेत...