आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांना वाटायचे, घराण्याला कलंक लावणार रवी किशन, आई म्हणाली होती, जीव वाचवून पळून जा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोजपूरी सिनेसृष्टीचा सुपरस्टार रवी किशनने 17 जुलै रोजी वयाची 47 वर्षे पूर्ण केली आहेत. रवी किशन आज कोट्यवधीश आहे. मात्र एक काळ असा होता, जेव्हा त्याच्याकडे खायलासुद्धा पैसे नसायचे. एका मुलाखतीत स्वतः रवी किशनने हा खुलासा केला. रवी किशन म्हणाला, 1990 साली मी जेव्हा गाव सोडून मुंबईत दाखल झालो, तेव्हा माझ्याकडे खायला पैसे आणि डोक्यावर छत नव्हते. दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी हाती येईल ते काम मी केले. काम मिळाले, तर पोटभर जेवायचो अन्यथा उपाशी पोटी रात्र काढावी लागायची. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला रवी किशनच्या आयुष्याशी निगडीत काही खास गोष्टी सांगत आहोत. 

 

गावात नाटकांमध्ये साकारायचा स्त्री पात्र...
- रवी किशनने सांगितले, की त्याला बालपणापासूनच अभिनयात रुची होती. गावात नाटकात काम करण्याची एकही संधी तो गमावत नसे. गावात जेव्हाही नाटक व्हायचे, तेव्हा त्याची एक भूमिका ठरलेली असायची. त्याने या नाटकांमध्ये स्त्री पात्र अधिक साकारले. 
- रवी किशनचे संपूर्ण नाव रवी किशन शुक्ला आहे. 17 जुलै 1969 रोजी जौनपूरच्या बिसुईं या एका छोट्या गावात जन्मलेल्या रवीच्या पत्नीचे नाव प्रीती आहे. या दाम्पत्याला एकुण चार मुले आहेत. रेवा, तनिष्क आणि इशिता ही त्यांच्या तीन मुलींची तर सक्षम हे मुलाचे नाव आहे.

 

जेव्हा आई म्हणाली, बेटा जीव वाचव आणि येथून पळून जा...
- रवी सांगितले, गावात कधीकधी त्याला रामलीलामध्ये सीतेची भूमिका साकारावी लागायची. त्याच्या वडिलांना त्याचे स्त्री पात्र साकारणे पसंत नव्हते. वडिलांची इच्छा होती, की त्यांच्या मुलाने नाटकात काम न करता शिक्षणाकडे लक्ष द्यावे. 
- मुलगा नालायक झाला, असे त्याच्या वडिलांना वाटायचे. त्यांचा मुलगा घराण्याच्या नावाला कलंक लावत असल्याचा त्यांचा समज झाला होता. 
- त्यामुळे रवी किशनला नेहमी त्याच्या वडिलांच्या हातचा मार खावा लागायचा. एकेदिवशी रागाच्या भरात त्याच्या वडिलांनी त्याला बेदम मारहाण केली होती. 
- आईने मध्यस्थी करुन रवी किशनला वडिलांच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर आई म्हणाली, की स्वतःचा जीव वाचव आणि येथून पळून जा. आईचे म्हणणे ऐकून रवी किशनने घर सोडले आणि तो मुंबईत पोहोचला.

 

मी एखाद्या अभिनेत्रीसोबत लग्न तर करणार नाही... वडिलांना वाटायची भीती..

- मी वडिलांनी पसंत केलेल्या मुलीसोबत लग्न केले. त्यांना वाटायचे, की मी एखाद्या अभिनेत्रीसोबत लग्न करेल. त्यांना या गोष्टीची नेहमी काळजी वाटायची. पण मी आईवडिलांच्या पसंतीनेच लग्न केले.
- मी स्टार झाल्यानंतर माझे वडील खूप आनंदी झाले. रवी किशनच्या वडिलांच्या रुपात लोक ओळख असल्याचा त्यांना अभिमान वाटतो.  

 

शिवभक्त आहे रवी किशन... 
अभिनयाशिवाय रवीला नृत्याचीही आवड आहे. जेव्हा तो 8 वर्षांचा होता तेव्हा दुसऱ्यांच्या लग्नात आणि गणपती पुजेमध्ये डान्स करायचा. रवी फार मोठा शिव भक्तही आहे.

 

लवकरच झळकमार एन.टी.आरच्या बायोपिकमध्ये... 
आंध्र प्रदेशात देवासारखे पुजले जाणारे अभिनेते आणि नेते एन. टी. रामाराव  यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार आहे. सुमारे शंभर कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटात भोजपुरी चित्रपटांचा सुपरस्टार रवी किशन रामाराव यांचे जीवलग मित्र रवी कांत नगाइच यांची भूमिका वठवणार आहे. चित्रपटाचे शूटिंग हैदराबाद येथे सुरु झाले आहे. यात विद्या बालन  एन. टी. आर. यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.  

 

तेलुगु, कन्नड आणि गुजराती सिनेमांमध्येही केले काम...
रवी किशनने भोजपूरी आणि हिंदी सिनेमांसोबतच इतर भाषांमध्येही काम केले. यामध्ये सुप्रीम, ओक्का अम्माई थप्पा आणि राधा (तेलुगु), हेबुल्ली (कन्नड) आणि हमीर (गुजराती) या सिनेमांचा समावेश आहे.

 

मुलीच्या रुपात जन्म घ्यायची इच्छा... 

मला अभिनय आणि नृत्य करायला खूप आवडते असे रवीने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते. झलक दिखला जाच्या सेटवर मी ‘होठों पे ऐसी बात…’ या गाण्यावर नृत्य केले होते. करवाचौथला मी माझ्या पत्नीच्या पायाही पडतो. पुढील जन्मी मला मुलगी बनायला नक्की आवडेल, असे रवीने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...