आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbaiच्या रस्त्यांवर अनुष्काने केली 'या' फिल्मची शूटिंग, देसी अंदाजात ओळखणे झाले कठीण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांनी त्यांच्या आगामी 'सुई धागा : मेड इन इंडिया' या चित्रपटाच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात केली आहे. गुरुवारी उशीरा रात्री दोघे मुंबईच्या रस्त्यांवर काही सीन शूट करताना दिसले. यावेळी अनुष्का सिंपल फ्लावर प्रिंट साडीत दिसली. तिच्या खांद्यावर एक लगेज बॅग दिसली. तर दुस-या हातात पर्स होती. या रुपात तिला क्षणभर ओळखणे कठीण झाले होते. तर वरुण चेक्ड शर्ट आणि  ब्लू जीन्समध्ये अतिशय साध्या रुपात दिसला. यापूर्वी दोघांनी भोपाळ आणि तेथील आजुबाजुच्या परिसरात या चित्रपटाचे शूटिंग केली होती.  

 

- 'सुई धागा'चे दिग्दर्शक शरत कटारिया असून यापूर्वी त्यांनी आयुष्मान खुराणा आणि भूमी पेडणेकर स्टारर 'दम लगाके हईशा' हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शरत यांनी या चित्रपटाती कथा लिहिली आहे. मनीष शर्मा यशराज फिल्म्सच्या बॅनरमध्ये हा चित्रपट प्रोड्युस करत आहेत. रिपोर्ट्सनुसार भारत सरकारने 2014 मध्ये लाँच केलेल्या 'मेक इन इंडिया' कॅम्पेनवर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटात वरुण धवन मौजी हे पात्र तर अनुष्का शर्माने ममता हे पात्र साकारले आहे. हा चित्रपट यावर्षी 28 सप्टेंबर रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, या चित्रपटाचे लेटेस्ट ऑनलोकेशन फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...