आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीचा हा चित्रपट पाहून भाळले होते बोनी कपूर, अशी होती Love story

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला. श्रीदेवी आपल्या कुटुंबीयांसह दुबईत पती बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्न समारंभासाठी गेली होती. तिथेच श्रीदेवीला हार्टअटॅक आला आणि बॉलिवूडच्या चाँदणीने अखेरचा श्वास घेतला. श्रीदेवी यांच्या पश्चात पती बोनी कपूर आणि दोन मुली असे कुटुंब आहे. 2017 मध्ये श्रीदेवीला चित्रपट सृष्टीत 50 वर्ष झाले होते. 2 जून 1996 मध्ये श्रीदेवीने बोनी कपूरसोबत लव्ह मॅरेज केले होते. 'सोलहवां सावन' चित्रपट पाहून बोनी कपूर श्रीदेवीच्या प्रेमात पडले असे म्हटले जाते. अशी होती या दोघांची लव्ह स्टोरी...

 

श्रीदेवीला भेटण्यासाठी चेन्नईला गेले, परंतु नाही झाली भेट...
बोनी श्रीदेवीला भेटण्यासाठी चेन्नईलासुध्दा गेले होते. परंतु श्रीदेवी सिंगापूरमध्ये असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. त्याचवेळी तिचा 'सोलहवा साल' हा पहिला सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा पाहून बोनी प्रभावित झाले आणि त्यांनी ठरवले, की ते निर्माता म्हणून श्रीदेवीसोबत सिनेमा करणार. एकेदिवशी सिनेमाच्या सेटवर बोनी श्रीदेवीची भेट घेण्यासाठी पोहोचले. पण श्रीदेवी यांनी त्यांची काम त्यांची आई पाहते.

 

दिली चित्रपटाची ऑफर
जेव्हा ते होणा-या सासूला भेटले तेव्हा त्या म्हणाल्या श्रीदेवी 'मि. इंडिया' सिनेमात काम करेल, परंतु तिचे मानधन 10 लाख रुपये असेल. बोनी यांनी उत्तर दिले, की ते 11 लाख रुपये देतील. श्रीदेवीच्या आईचा आनंद गगनात मावेना. अशाप्रकारे बोनी यांना आपल्या प्रेमाजवळ येण्याची संधी मिळाली.


त्यांनी श्रीदेवीसाठी सर्व स्पेशल सुविधा ठेवल्या. परंतु अजूनही त्यांचे प्रेम एकतर्फीच होतेच. कारण श्रीदेवी मिथुन चक्रवर्तीवर प्रेम करत होती. दुसरीकडे बोनी कपूर यांनी मोना कपूरसोबत अरेंज मॅरेज केले होते. त्यानंतर मिथुन आणि श्रीदेवीच्या विभक्ताच्या चर्चा रंगू लागल्या. बोनी यांनी पुन्हा श्रीदेवीसोबत जवळीक वाढवण्यास सुरुवात केली. एकदा बोनी श्रीदेवीला भेटण्यासाठी स्वित्झर्लंडला पोहोचले होते.

 

आईच्या आजारपणामुळे संपला होता दूरावा...
श्रीदेवीच्या आई आजारी पडल्यानंतर या लव्हस्टोरी महत्वाचे वळण आले. तिच्या आईवर अमेरिकेत उपचार सुरु होते. यादरम्यान बोनी कपूर यांनी श्रीदेवीला मानसिक, भावनिक आणि अर्थिक रुपात मदत केली होती. तिच्या आईचे कर्जसुध्दा बोनी यांनी फेडले होते. श्रीदेवी त्यांच्या या कामाने खूप प्रभावित झाली आणि बोनीच्या प्रेमाला होकार दिला.


बोनी आणि मोना यांचे कमकुवत पडलेले नाते अखेर संपुष्टात आले. 1996मध्ये श्रीदेवी आणि बोनी यांनी लग्न केले. दोघांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत. 


पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचे निवडक फोटो...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...