आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका हिटनंतर केले बी-ग्रेड चित्रपाटत काम, ऋषीची ही अभिनेत्री आता अज्ञातवासात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : ऋषी कपूरचा '102 नॉट आउट' शुक्रवारी रिलीज झाला. चित्रपटात ते 102 वर्षांच्या अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिका साकारत आहेत. यात त्यांचे वय 75 आहे. ऋषी कपूर यांनी यापुर्वी 2017 मध्ये 'पटेल की पंजाबी शादी' मध्ये काम केले होते. ऋषी यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत काम केले. यामध्ये काही अभिनेत्रींची नाव सर्वांना माहिती आहेत. परंतू काही अभिनेत्रींविषयी खुप कमी लोकांना माहिती असेल. काजल किरण यापैकीच एक अभिनेत्री आहे. 1977 मध्ये आलेल्या 'हम किसी से कम नहीं' मध्ये तिने ऋषी कपूरसोबत काम केले होते. काजलने याच चित्रपटातून डेब्यू केला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला परंतू काजलला या यशाचा काहीच फायदा झाला नाही. एक चित्रपट हिट असूनही तिला नंतर चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या नाहीत. यानंतर तिला काही बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करावे लागले.


- मराठी कुटूंबात जन्मलेल्या काजल किरणचे खरे नाव सुनीता कुलकर्णी आहे.
- नासीर हुसैनने तिला आपल्या 'हम किसी से कम नहीं'  या चित्रपटासाठी निवडले होते.
- तिने 'मांग भरो सजना' (1980), 'सबूत' (1980), 'वारदात' (1981), 'दहशत' (1981) 'कराटे' (1983), 'एक बार चले आओ' (1983), 'भागो भूत आया' (1985) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. बॉलिवूडसोबत तिने साउथच्या काही चित्रपटांमध्ये काम केले.
- काजल इंडस्ट्रीमध्ये स्वतःला सिध्द करु शकली नाही. तिने 1990 मध्ये लग्न करुन भारत देश सोडला.
- आज ती कुठे आहे कुणालाही माहिती नाही. इंटरनेटवरही तिच्याविषयी जास्त माहिती उपलब्ध नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या काजल किरणसंबंधीत काही गोष्टी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...