आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यभर अविवाहित होत्या रिता भादुरी, रजा मुरादसोबतच्या 40 सेकंदांच्या सीनमुळे आल्या होत्या चर्चेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: चित्रपट आणि टीव्हीची प्रसिध्द अभिनेत्री रीता भादुरी यांचे आज (17 जुलै, मंगळवार) निधन झाले. त्या 62 वर्षांच्या होत्या. मीडिया रिपोर्टनुसार त्यांच्या दोन्ही किडन्या कमकुवत झाल्या होत्या. आणि दिर्घकाळापासून त्या प्रत्येक दोन दिवसांना डायलिसिससाठी जात होत्या. रिता मुंबईच्या सुजय हॉस्पिटलच्या ICU मध्ये अॅडमिट होत्या. त्यांनी बॉलिवूडमध्ये 70 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले होते. परंतू लीड अभिनेत्री म्हणून त्यांना ओळख मिळू शकली नाही. बॉलिवूड अभिनेता रजा मुराद यांनी त्यांच्या काही खास गोष्टी आमच्या वेबसाइटसोबत शेअर केल्या.


रजा मुराद म्हणाले, "रिता माझी खुप जुनी कलीग आहे. 1971 पासून त्या चित्रपटांमध्ये काम करत होत्या. त्यांच्या आई चंद्रिमासुध्दा चित्रपटांमध्ये काम करत होत्या. रिताचा सर्वात चांगला चित्रपट 'जूली' आहे. यासाठी त्यांच्या कामाची प्रशंसा होत होती. आम्ही दोघांनी 1990 मध्ये आलेल्या 'नया खून'मध्ये एकत्र काम केले होते. त्यांनी माझ्यासोबत लीड रोल केला होता."
त्यांनी सांगितले की, "रिताने लग्न केले नव्हते, परंतू याचे कारण समोर आले नव्हते. त्यांच्या चेह-यावर अवेळी सुरकूत्या दिसत होत्या. त्यांनी वडोदरामध्ये बंगलाही बनवला होता. त्यांनी हिंदीसोबतच गुजराती चित्रपटांमध्येही काम केले, परंतू प्रचंड मेहनत करुनही त्यांना अपेक्षित मिळू शकले नाही."


रजा मुरादसोबत दिला होता बोल्ड सीन 
रिता भादुरी या चित्रपटांमध्ये लीड अॅक्ट्रेस म्हणून ओळख बनवू शकल्या नाही. 'जूली' चित्रपटांतून त्यांना बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस फिल्म फेअर अवॉर्ड मिळाला होता. त्यांनी 9 फेब्रुवारी, 1990 मध्ये आलेल्या 'नया खून' चित्रपटात रजा मुराज यांच्यासोबत काम केले होते. या चित्रपटात त्यांनी 40 सेकंदांचा बोल्ड सीन दिला होता. याची खुप चर्चाही झाली होती.


कमल हसनसोबतही केला होता एक बोल्ड सीन
1974 मध्ये रिता यांनी कमल हसनसोबत मल्याळम चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे कमल हसन चाइल्ड आर्टिस्टनंतर याच मल्याळम चित्रपट 'कन्याकुमारी' मधून इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करत होते. कलम हसन यांना या चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्डही देण्यात आला होता. रिता भादुरी यांना या चित्रपटात ओळखणेही कठीण आहे. 

 

आजारी असतानाही करत होत्या शूटिंग
'निमकी मुखिया' या टीव्ही शोमध्ये रिता या इमरती देवीच्या भूमिकेत होत्या. किडनी डायलिसिस सुरु असूनही त्या याची शूटिंग करत होत्या. याविषयी मीडियासोबत बोलताना त्यांना म्हणाल्या होत्या की, "म्हातारपणी येणा-या आजारांच्या भितीने काम सोडायचे का?मला काम करणे आणि व्यस्त राहणे आवडते. मला प्रत्येक वेळा माझ्या खराब तब्येतीविषयी विचार करायला आवडत नाही. यामुळे मी स्वतःला व्यस्त ठेवते." सेटवरही लोक त्यांची पुर्ण काळजी घेत होते. त्यांच्या सोयीनुसार शिफ्ट टायमिंग ठरवत असत.
 

बातम्या आणखी आहेत...