आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rohit Shetty Birthday Special Family Member Of Bollywood Stars Also Act In Movies

रोहित शेट्टीपासून \'गब्बर\'च्या वडिलांपर्यंत, या 7 बॉलिवूड स्टार्सचे आईवडील होते कलाकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहित शेट्टी आणि त्यांचे वडील एमबी शेट्टी - Divya Marathi
रोहित शेट्टी आणि त्यांचे वडील एमबी शेट्टी

आज आपला 44 वा वाढदिवस साजरा करणारे रोहित शेट्टी बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. मात्र त्यांचे वडीलसुद्धा बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे.  एमबी शेट्टी हे रोहित शेट्टी यांच्या वडिलांचे नाव असून त्यांनी अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. 'यादों की बारात' (1973), 'डॉन' (1978), 'त्रिशूल' (1978), 'फकीरा' (1976), 'कालीचरण'(1976), 'शंकर दादा'(1976) सह अनेक सिनेमांमध्ये एमबी शेट्टी झळकले आहेत. 


रोहित शेट्टी यांचा जन्म 14 मार्च 1974 रोजी मुंबईत झाला होता. त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी सहायक दिग्दर्शक म्हणून कामाला सुरुवात केली होती. 'फूल और कांटे' या सिनेमासाठी त्यांनी कुकू कोहली यांना असिस्ट केले होते. दिग्दर्शक म्हणून रोहित यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. 


बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांच्या कुटुंबीयांनी सिनेमांमध्ये काम केले, मात्र त्यांच्याविषयी लोकांना फार कमी लोकांना ठाऊक आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी.. 

बातम्या आणखी आहेत...