आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Roja Movie Actor Arvind Swamy Life Interesting Facts Accident ने उद्धवस्त झाले होते \'रोजा\' फेम या अॅक्टरचे करिअर, आता करतोय कमबॅक

Accident ने उद्धवस्त झाले होते \'रोजा\' फेम या अॅक्टरचे करिअर, आता करतोय कमबॅक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बॉम्बे' सिनेमातील एका दृश्यात मनीषासोबत, रोजा चित्रपटातील एका दृश्यात मधूसोबत अरविंद, दुसरा फोटो -अपघातानंतर आता असे दिसतात अरविंद - Divya Marathi
'बॉम्बे' सिनेमातील एका दृश्यात मनीषासोबत, रोजा चित्रपटातील एका दृश्यात मधूसोबत अरविंद, दुसरा फोटो -अपघातानंतर आता असे दिसतात अरविंद


मुंबई/चेन्नईः 90च्या दशकात 'बॉम्बे' या सिनेमाद्वारे प्रसिद्ध झालेले तामिळ अभिनेते अरविंद स्वामी यांनी दिग्दर्शक सेल्वा यांच्या आगामी Vanangamudi या तामिळ चित्रपटातून कमबॅक करत आहे. येत्या 31 ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार असून हा एक अॅक्शन पट आहे. या सिनेमात एक दोन नव्हे तर चार अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. नव्वदच्या दशकात काही सिनेमे केल्यानंतर अरविंद यांनी सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला आणि फॅमिली बिझनेसकडे लक्ष केंद्रित केले. पण जेव्हा ते सिनेसृष्टीत कमबॅक करण्याच्या तयारीत होते, त्याचकाळात त्यांचा अपघात झाला होता. मणक्याला दुखापत झाल्याने त्यांना अर्धांगवायू झाला. यातून पूर्णपणे बरे व्हायला त्यांना बराच काळ लागला. 


अभिनेता नव्हे व्हायचे होते डॉक्टर...
एका मुलाखतीत अरविंद यांनी सांगितले होते, की ''दहावी पास झाल्यानंतर त्यांची डॉक्टर व्हायची इच्छा होती. पण मी फॅमिली बिझनेस सांभाळावा, अशी वडिलांची इच्छा होती. त्यामुळे डॉक्टर होता आले नाही. कॉलेजच्या काळात पॉकेट मनीसाठी मी मॉडेलिंग करायचो. कॉलेजमध्ये एका जाहिरातीत मी काम केले होते. ती जाहिरात बघून मणिरत्नम यांनी मला मीटिंगसाठी बोलावले. त्यानंतर त्यांनी आणि संतोष सिवान यांनी मला अभिनयातील बारकावे शिकवले. मला पहिला ब्रेक मणिरत्नम यांनीच दिला होता." 


पुढील स्लाईड्समध्ये वाचा, पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन थाटले दुसरा संसार..

 

बातम्या आणखी आहेत...