आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुबेहूब वडील सैफ सारखा दिसतो मोठा मुलगा इब्राहिम, शेअर केला PHOTO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम अली खानने आपल्या इंस्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो पूलमध्ये दिसतोय. फोटो शेअर करत त्याने कॅप्शन लिहिले की,  'Only time will tell'.इब्राहिम हा हुबेहुब वडील सैफची कॉपी आहे. तो सध्या शिक्षण घेत आहे. इब्राहिमला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे. त्याला फुटबॉल खेळायला आवडते. इब्राहिम भविष्यात कोणत्या क्षेत्रात जाईल हे सांगता येणे कठीण आहे. परंतू त्याने 2008 मध्ये 'टशन' चित्रपटात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून डेब्यू केला आहे. इब्राहिम लाइमलाइटपासून दूर राहतो. परंतू आपल्या फ्रेंड्ससोबत पार्टी एन्जॉय करायला त्याला खुप आवडते. तो सलमानचा भाचा निर्वाण खान, चंकी पांडेचा भाचा अयान पांडे, श्रीदेवीची मुलगी खुशी कपूरसोबत फ्रेंड्ससोबत पार्टी एन्जॉय करताना दिसतो. 

 

सैफच्या पहिल्या बायकोचा मुलगा आहे इब्राहिम
- इब्राहिम हा सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंहचा मुलगा आहे. त्याचा जन्म 2001 मध्ये झाला होता.
- सैफ आणि अमृता विभक्त झाल्यानंतर तो आपली आई अमृता आणि मोठी बहिण सारासोबत राहतो.
- सारा 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तिचा हा चित्रपट याच वर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज होईल.
- अमृतापासून वेगळे झाल्यानंतर सैफने 2012 मध्ये करीना कपूरसोबत लग्न केले.
- सध्या सैफ आपली वाइफ करीना कपूर आणि मुलगा तैमूरसोबत लंडनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...