आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाग्यश्रीच्या परवानगीशिवाय हात लावणार नाही, 'मैने प्यार किया'च्या शूटिंगवेळी सलमानने दिली होती ताकीद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - सलमान खानचा आगामी चित्रपट 'रेस 3' ईदच्या दिवशी म्हणजेच १५ जून रोजी रिलीज होणार आहे.चित्रपटात सलमान याच जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. तसे पाहिले तर सलमान खानच्या नावाने अनेक विवाद नेहमीच असतात. पण इतके विवाद असूनही सलमान खानची प्रतिमा मलिन कधी झाली नाही त्याचे कारण म्हणजे तो किती चांगला व्यक्ती आहे हे तो वेळोवेळी सिद्ध करतो. असाच एक किस्सा आपल्याला ऐकायला मिळतो जेव्हा सलमान खान 'मैने प्यार किया' चित्रपटाचे शूटिंग करत होता. 1989 साली आलेल्या या चित्रपटात भाग्यश्री त्याची नायिका होती...

 

- भाग्श्रीने एका मुलाखतीत सांगितले की,  तिची आणि सलमानची पहिली भेट चित्रपटाच्या पोस्टर शूटवेळी झाली होती. दोघे फोटोग्राफरकडे फोटोशूटसाठी गेले होते.
- फोटोग्राफरने सलमानला सांगितले की, फोटोसाठी सलमान खानला भाग्यश्रीला एकदम घट्ट मिठी मारायची आहे. सलमान फोटोग्राफरचे हे वाक्य ऐकून घाबरला.
- सलमानने फोटोग्राफरला सांगितले की भाग्यश्रीच्या परमिशनशिवाय तो तिला हात लावणार नाही. 
- भाग्यश्रीने सांगितले की जेव्हा सलमानच्या तोंडून हे वाक्य ऐकले तेव्हा त्याच्यासाठी असणारा आदर दुणावला. तो काळ असा  
होता की तेव्हा अभिनेत्रींना तिताक आदर मिळत नसे.


सलमान-भाग्यश्रीचा होत्या डेब्यू चित्रपट..
सलमान खान आणि भाग्यश्रीचा हा डेब्यू चित्रपट होता. चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि त्यानंतरही सलमान खानला 6 महिने काम मिळाले नव्हते. काम मिळाल्यानंतर सलमानने कधीही वडिलांच्या नावाचा वापर केला नाही. 'मैने प्यार किया'नंतर सलमान 'बागी' चित्रपटात झळकला होता. 

 

रिलीजच्या अगोदरच 'रेस 3' ने तोडला 'दंगल'चा रेकॉर्ड
सलमान खानच्या रेस ३ ने रिलीजअगोदरच आमिर खानच्या दंगलचा रेकॉर्ड तोडला आहे. मीडीयाने दिलेल्या माहितीनुसार, 
 'रेस 3'चे सॅटेलाईट राईट्स 150 कोटींना विकले गेले आहेत. तर दंगलचे 75 कोटींना विकले गेले होते. चित्रपटात 
 सलमानशिवाय अनिल कपूर, बॉबी देओल, जॅकलीन फर्नांडीज, शाकिब सलीम आणि डेजी शाह लीड रोलमध्ये आहेत.
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, सलमान खानचे 'मैने प्यार किया' चित्रपटातील काही फोटोज्...
 

बातम्या आणखी आहेत...