आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईः लोकांना परदेशात पाठवण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पॉप गायक दलेर मेहंदीला पतियाळा कोर्टाने दोषी ठरवत 2-2 वर्षांची कैद सुनावली. यानंतर केवळ दहाच मिनिटांत दलेर मेहंदीची 40 हजार रुपयांच्या मुचलक्यावर जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमशेरवर आरोप होता, की त्यांनी काही लोकांना आपल्या टीममध्ये असल्याचे सांगून बेकायदेशीररित्या विदेशात घेऊन गेले होते. यासाठी ते मोठी रक्कम घेत होते. हे प्रकरण 1998 ते 2003 दरम्यानचे आहे. बॉलिवूडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे, जिने ह्युमन ट्रॅफिकिंगचा शिकार झालेल्या लोकांसाठी नो मोर टिअर नावाची संस्था सुरु केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे सलमान खानची पुर्वाश्रमीची गर्लफ्रेंड सोमी अली आहे.
पाच वर्षांची असताना लैंगिक शोषण आणि 13 व्या वर्षी झाला होता सोमीवर बलात्कार...
- सोमी अलीचे ती पाच वर्षांची असताना लैंगिक शोषण झाले होते. याची माहिती स्वतः सोमी अलीने एका मुलाखतीदरम्यान दिली होती.
- मुळची पाकिस्तानातील सोमी अली आता अमेरिकेत 'नो मोअर टिअर्स' नावाच्या सामाजिक संस्थेसाठी काम करते. ही संस्था पीडित स्त्रियांसाठी काम करते.
- सोमीने मुलाखतीत सांगितले, की मी पाकिस्तानमध्ये अशा वातावरणात वाढले जिथे महिलांना अतिशय वाईट पद्धतीने वागवले जात होते. माझ्या आईच्या अनेक मैत्रिणींना घरात मारहाण होत होती. जेव्हा मी माझ्या आईला तिच्या मैत्रिणींच्या शरीरावरील व्रणांबद्दल विचारत होते, तेव्हा मला सांगितले जात होते की ती पायर्यांवरुन पडली किंवा स्वंयपाक घरात काम करताना चटका बसला. वास्तव हे होते, की त्यांना घरात मारहाण होत होती, आणि त्याहून वाईट गोष्ट म्हणजे ते त्यांच्या सवयीचे झाले होते.
नोकराने केले होते शोषण...
- सोमीने स्वतःवर गुदरलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले. ती म्हणाली, 'घरात एक नोकर होता, त्याने माझे लैंगिक शोषण केल. तेव्हा मी पाच वर्षांची होते. वयाच्या 12 व्या वर्षी मी कुटुंबासोबत यूएसमध्ये शिफ्ट झाले. तेथे 13 व्या वर्षी माझ्यावर रेप झाला होता."
- "जेव्हा मला शाळा आणि विद्यापीठांमध्ये बोलण्याची (भाषणाची) संधी मिळाली तेव्हा मी हा प्रसंग विद्यार्थ्यांसोबत शेअर केला. यामुळे इतरांनाही अशा प्रसंगातून जावे लागले असेल तर त्यांना बळ मिळेल, त्यांनी स्वतःला दोष न देता मोकळेपणाने समोर येण्याची प्रेरणा मिळेल, अशी भावना त्या पाठीमागे होती," असे सोमी म्हणाली होती.
पुढे वाचा, सलमान खान होता सोमीचे पहिले प्रेम... आणि बरंच काही...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.