आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • बॉबी देओल, सलमान खान, Salman Khan Helped Me Get Back In Shape Says Bobby Deol

असा दिसू लागला होता बॉबी देओल, सलमान खानने बदलला लूक तर मिळू लागले आता काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः नव्वदच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता बॉबी देओलला मध्यंतरी इंडस्ट्रीत काम मिळणे बंद झाले होते. तो केवळ त्याच्या होम प्रॉडक्शनच्या 'यमला पगला दीवाना' सीरिज आणि 'पोस्टर बॉइज' या चित्रपटांमध्येच झळकला. पण आता त्याच्याजवळ कामाची कमतरता नाही आणि याचे सगळे श्रेय जातं ते अभिनेते सलमान खानला. सलमानमुळेच आता बॉबीला इंडस्ट्रीत पुन्हा एकदा कामं मिळू लागली आहेत. आगामी 'रेस-3' या चित्रपटात बॉबी देओल अगदी वेगळ्या लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


सलमान खानने केले मोटिव्हेट...
- बॉबी देओलने एका मुलाखतीत सांगितले, की मध्यंतरी तो बराच लठ्ठ झाला होता. पण बॉडी पुन्हा एकदा शेपमध्ये आणण्यासाठी त्याला सलमान खाननेच मोटिव्हेट केले.
- या ट्रान्सफॉर्मेशनमुळे तो पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आला आहे.
- बॉबीने सांगितले की, त्याने मधल्या काळात स्वतःकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केले होते. त्यामुळे त्याला चित्रपटांच्या ऑफर मिळणे बंद झाले होते.
- सलमान खानमुळेच पुन्हा एकदा स्वतःचे फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केल्याचे बॉबीने या मुलाखतीत कबुल केले.
- बॉबी म्हणाला, की देवानेच सलमानला माझ्याकडे पाठवले आणि आता मी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागलोय.

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, बॉबी देओलविषयी आणखी बरंच काही...

बातम्या आणखी आहेत...