आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदूरमधील एका गावात सलमानने शिकली होती ड्रायविंग, सर्वात पहिले चालवली होती ही जीप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'रेस 3' 15 जूनला रिलीज होत आहे. या चित्रपटात सलमान खान अनेक महागड्या कार चालवताना आणि स्टंट करताना दिसणार आहे. परंतू तुम्हाला माहिती नसेल, की, या महागड्या गाड्या चालवणारा सलमान सर्वात पहिले जीप चालवून ड्रायव्हिंग शिकला होता. ही जीप त्याचे कजिन मुबीन खान यांची होती. जसीम खान यांच्या 'बीइंग सलमान' नुसार, सलमान आपल्या घरापासून(इंदौर) काही दूर अंतरावर बरदारी गावात जात होता. येथे तो कजिन आणि मित्रांसोबत जीप चावलणे शिकत होता.


रेसिंग स्टंट दरम्यान मोडला होता सलमानचा हात
सलमानचे कजिन मुबीन खान यांच्यानुसार, आमचे बालपण आनंदात गेले. आम्ही आजुबाजूच्या गावांमध्ये जीपने जायचो आणि तिथल्या धुळीने माखलेल्या रोडवर बाइक स्टंट करायचो. यासोबतच सलमान आणि आम्ही झाडावर चढून ताजी फळं खायचो. एकदा आम्ही बरदारी गावात होतो तेव्हा रेसिंग स्टंट दरम्यान सलमानचा हात मोडला होता. या ठिकाणी सलमानचे सर्व कजिन आणि फ्रेंड्स खेळण्यासाठी नेहमी बोलवत असत. मुबीननुसार अनेक वेळा आम्ही चिखलामधून जीप चालवायचो. एकदा तर जीप चिखलात अडकली. तेव्हा आम्ही सर्वांनी मिळून धक्का लावून जीप बाहेर काढली. नंतर चिखलाने आमचे कपडे खराब झाले तेव्हा आम्ही सर्वांनी विहिरीत उडी मारुन स्विमिंग केली होती. 



पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या सलमान खानविषयी बरेच काही...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...