आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईः अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे प्रेमप्रकरण जगजाहीर आहे. एकेकाळी हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पण या प्रेमाला वादाची मोठी किनार आहे. सलमान सेटवर जाऊन ऐश्वर्याला मारहाण करत असल्याचे आपण अनेकदा वाचले असावे. पण काही दिवसांपूर्वी सलमान खानची एक जुनी मुलाखत इंटरनेटवर व्हायरल झाली होती. व्हायरल झालेल्या मुलाखतीत सलमानने त्याची पुर्वाश्रमीची गर्लफ्रेंड ऐश्वर्याला मारहाण केली नसल्याचे म्हटले आहे. त्याच्यावर झालेल्या अनेक आरोपांचे त्याने या मुलाखतीत खंडन केले. 2002 साली एका लीडिंग डेलीला दिलेल्या मुलाखतीत सलमान खानला ऐश्वर्याला मारहाण केल्याविषयी विचारणा झाली होती, तेव्हा सलमानने मी कधीही ऐश्वर्याला मारहाण केली नसल्याचे म्हटले होते. याच मुलाखतीत मात्र त्याने दिग्दर्शक सुभाष घईच्या थोबाडीत लगावल्याचे कबुल केले होते. सुभाष घईंच्या 'ताल' या सिनेमात ऐश्वर्याने काम केले होते.
2002 साली झाले होते सलमान-ऐश्वर्याचे ब्रेकअप...
ऐश्वर्या आणि सलमान यांनी 'हम दिल दे चुके सनम'(1999) या सिनेमात एकत्र काम केले होते. याच सिनेमाच्या शूटिंगच्या काळात दोघांमध्ये जवळीक वाढली होती. मात्र 'हम तुम्हारे हैं सनम' (2002) या सिनेमाच्या रिलीजनंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते. या सिनेमात ऐश्वर्या सलमानच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकली होती. दोघांच्या ब्रेकअपचे खरे कारण काय होते? हे तर फार कमी जणांना ठाऊक आहे. मात्र कथितरित्या ऐश्वर्याने सलमानवर मारहाण केल्याचा आरोप लावला होता. 2007 साली ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले.
पुढे वाचा, व्हायरल झालेल्या मुलाखतीत काय म्हणाला होता सलमान...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.