आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईः अभिनेता सलमान खान सध्या काश्मिरमध्ये त्याच्या आगामी 'रेस 3' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. शूटिंगसोबतच सलमान काश्मिरच्या खो-यात फिरण्याचा आनंद लुटतोय. कडक सुरक्षाव्यवस्थेत सलमान सोनमर्ग येथे जीप चालवाताना स्पॉट झाला. जीपमध्ये सलमानसोबत त्याचा बॉडीगार्ड शेरा आणि दोन बंदुकधारी सुरक्षागार्ड होते. सलमानला बघून चाहत्यांनी त्याच्या भोवती गराडा घातला होता. रेस 3 या चित्रपटाताली 'अल्ला दुहाई है..' या गाण्यातील काही सेकंदाच्या सीन्सच्या शूटसाठी सलमान काश्मिरमध्ये आहे. त्याच्यासोबत चित्रपटाचे निर्माते रमेश तौरानी आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही काश्मिरमध्ये मुक्कामाला आहेत.
जॅकलिनने चालवली जीप...
- सलमान खानच नव्हे तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससुद्धा यावेळी जीप चालवाताना दिसली.
- सलमानने जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचीही भेट घेतली.
- निर्माते रमेश तौरानी यांनी या भेटीचा एक फोटो ट्विटरवर शेअर करुन लिहिले, 'We thank the Chief Minister Madam Mehbooba Mufti for welcoming us in Kashmir for the Final Lap of #Race3'.
- सलमानच्या अनेक चिमुकल्या फॅन्सनी यावेळी त्याची भेट घेतली.
- सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटातील शेवटच्या शेड्युलसाठी लद्दाखला रवाना होण्यापूर्वी सलमानने रिसॉर्ट-टाऊनमध्ये गाण्याच्या काही भागांचे शूटिंग पूर्ण केले. जम्मू-काश्मिर पोलिस आणि पर्यटन विभागाच्या वतीने शूटिंगस्थळी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती.
- 'रेस 3'मध्ये सलमानसोबत जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देओल आणि शाकिब सलीम यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
- रेमो डिसुजा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
- तीन वर्षांपूर्वी 'बजरंगी भाईजान'च्या शूटिंगच्या निमित्ताने सलमान पहलगाम येथे आला होता.
पुढील स्लाईड्सवर बघा, येथे क्लिक झालेले सलमान खानचे फोटोज...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.