आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khan Thanks Fans For Race 3 Success Twitterati Wonder He Is Offering Refund

RACE 3: 150 कोटी कमाई केल्यानंतर सलमानने मानले आभार प्रेक्षकांचे आभार, फॅन्सने उडवली खिल्ली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : सलमानच्या 'रेस-3' चित्रपटाने 150 कोटींची कमाई केली आहे. एकाच आठवड्यात चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार केला होता. या गोष्टीवर उत्साहित असलेल्या सलमानने एक ट्वीट केले - "चित्रपटगृहात जाऊन 'रेस 3' पाहणा-या सर्वच प्रेक्षकांचे मी आभार मानतो. तुम्हाला चित्रपट आवडला यामुळे आनंदी आहे. चित्रपटासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे मी आभार मानतो. देवाने तुमच्यावर कृपा करावी आणि तुम्ही चित्रपट पाहत राहावे. आमच्यासाठी हे खुप महत्त्वाचे आहे." याच कराणामुळे काही सोशल मीडिया यूजर्स चिडले आणि सलमानची खिल्ली उडवली. 'तिकीट परत करणार आहात का?'
- एका यूजरने सलमानच्या ट्वीटवर कमेंट करत लिहिले - 'ज्या पैशांनी आम्ही तुमच्या चित्रपटाचे तिकीट खरेदी केले, ते पैसे तुम्ही आम्हाला परत करणार आहात का?' 
- एका यूजरने लिहिले 'थँक्यू नका म्हणू...कोणत्याही तीन 'रेस-3'ऑडियन्सचे पैसे परत करा... आणि त्यांना सांगा की, पुढच्या 3 लोकांचे पैसे करा.' 
- एकाने लिहिले की, 'याचे पैसे परत मिळाले तर मी 'ट्यूबलाइट' पुन्हा पाहून घेईल.'
- जास्तीत जास्त फइल्म क्रिटिक्सने चित्रपट कमजोर असल्याचे सांगितले आहे. तरीही चित्रपटाची वर्ल्डवाइल्ड कमाई जवळपास 255 कोटी आहे. 

बातम्या आणखी आहेत...