आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लव्हरात्री\'साठी सलमानला गवसली \'ही\' मुलगी, उलगडले \'मुझे लडकी मिल गयी...\' ट्वीटमागचे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा दबंग अर्थातच अभिनेता सलमान खान लग्न कधी करणार?  हा प्रश्न अवघ्या देशाला पडला आहे. सलमान जिथे जाईल तिथे त्याला हा प्रश्न विचारला जात होता. पण सलमानने नुकतेच  'मुझे लडकी मिल गयी है...' असे ट्वीट करुन त्याच्या चाहत्यांना आनंदवार्ता दिली. या ट्वीटनंतर सलमानला लग्नासाठीच मुलगी गवसली असा अंदाज वर्तवला जाऊ लागला. खरं तर सलमानचे ट्वीटसुद्धा संभ्रम निर्माण करणारेच होते.  आता मात्र सलमानच्या या ट्वीटमागचे सत्य समोर आले आहे. सलमानला मुलगी मिळाली, पण ती त्याच्या लग्नासाठी नसून आगामी एका चित्रपटातील अभिनेत्री आहे. 

 

बहिणीच्या नव-याच्या चित्रपटासाठी मुलीचा शोध होता सुरु...

सलमानची लाडकी बहीण अर्पिताचा पती आयुष शर्माला सलमान खान सिनेसृष्टीत लाँच करतोय. काही दिवसांपूर्वी सलमानने आयुषला लाँच करत असल्याची अधिकृत घोषणासुद्धा केली होती. 'लव्हरात्री' हे आयुष शर्माच्या पहिल्या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटासाठी अभिनेत्रीचा शोध सुरु होता. आता हा शोध पूर्ण झाला आहे. या चित्रपटासाठी निवड झालेल्या अभिनेत्रीचे नाव आहे वरीना. आयुषसोबत वरीना लीड रोल साकारणार आहे. वरीनाविषयीची अधिक माहिती समोर आलेली नाही.  

 

 

संभ्रम निर्माण करणा-या ट्वीटनंतर सलमानचे आणखी एक ट्वीट...

मुझे लडकी मिल गयी... हे ट्वीट केल्यानंतर तब्बल दीड तासाने सलमानने या ट्वीटमागचे रहस्य उलगडले. त्याने वरीनाचा एक फोटो शेअर करुन ती आयुष शर्मासोबत लव्हरात्री या चित्रपटात झळकणार असल्याचे ट्वीट केले. त्याने ट्वीटमध्ये लिहिले,  "Nothing to worry na @aaysharma ki film #Loveratri ke liye ladki mil gayi Warina, Toh dont worry na be happy na"

 

 

सत्य उघडकीस आल्यामुळे होणार चाहत्यांची निराशा...

आता सत्य समोर आल्यानंतर सलमानच्या चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा होणार हे नक्की. पण तासाभरापूर्वी जेव्हा सलमानने हे ट्वीट केले, तेव्हा तो लग्न करणार म्हणून चाहत्यांमध्ये आनंद पसरला होता.  त्याच्या या ट्विटला अवघ्या तासाभरात 18 हजारांहून अधिक लाईक असून 63 हजारांहून अधिक चाहत्यांनी कमेंट केले आहेत. अनेकांनी सलमानला शुभेच्छा दिल्या. तर काही तरूणींनी नाराजी व्यक्त केली. 

 

पुढील स्लाईडवर बघा, सलमानने शोध घेतलेल्या वरीनाचा फोटो आणि सलमान खानचे ट्वीट... 

बातम्या आणखी आहेत...