आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day: अपमान सहन नव्हता झाला सलमान खानला, जुही चावलाचा असा घेतला बदला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानचा आज वाढदिवस आहे. - Divya Marathi
सलमान खानचा आज वाढदिवस आहे.

90चे दशक हे अनेक स्टार्सचे सितारे बुलंद करणारे होते. तेव्हा बॉलिवूडमध्ये शाहरुखपासून गोविंदा, आमिर खान आणि अक्षय कुमारचा बोलबाला होता. तर हिरोईन्समध्ये जुही चावला, करिश्मा कपूर, राणी मुखर्जी आणि रवीना टंडन यांची चलती होती. सहाजिक आहे की प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाला टॉपचे हिरो-हिरोईन आपल्या फिल्ममध्ये असावे असे वाटणार. 

 

जुहीने तोडले होते सलमानचे स्वप्न
- त्या काळात सलमान खानचे स्वप्न होते की जुहीसोबत एक फिल्म करावी. 90च्या दशकात एक वेळ अशी आली होती जेव्हा सलमानचे करियर डगमगायला लागले होते. त्याच्या एकानंतर एक अनेक फिल्म फ्लॉप झाल्या होत्या. त्यामुळे निर्माते-दिग्दर्शकही त्याला टाळत होते. 
- काही फिल्ममेकर असेही होते, ज्यांना सलमानमध्ये उद्याचा सुपरस्टार दिसत होता आणि ते आपल्या फिल्ममध्ये सलमानला कास्ट करत होते. असाच एक फिल्ममेकर एका फिल्मची ऑफर घेऊन जुहीकडे गेला होता. तेव्हा जुहीचा बोलबाला होता. ती सुपरस्टार होती. तिने फिल्मला होकार देत एक अट ठेवली. ती अट होती फिल्ममेकरला कोड्यात टाकणारी होती. 
- जुहीने फिल्ममेकरसमोर प्रस्ताव ठेवला की ती फिल्म करण्यास तयार आहे. फक्त फिल्ममध्ये सलमान ऐवजी आमिर खानला कास्ट करावे. 
- सलमान खानला जेव्हा हे कळाले तेव्हा त्याला फार दुःख झाले होते. वेळ निघून गेला, सलमानचे स्टार चमकले. जुहीसाठीही वेळ कायम राहिली नाही. तिचे स्टारडम हळुहळु कमी होत गेले. हळुहळु ती बॉलिवूडमधूनही गायब झाली. मात्र नंतर परत कधी तिला सलमानसोबत काम करण्याची संधी मिळाली नाही. 
- अशी माहिती आहे की नंतर जुहीने अनेकदा सलमानबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली परंतू प्रत्येकवेळी सलमानला 90चा तो काळ आठवत राहिला. 
- एकदा तर सलमानने जुहीला आपल्या फिल्ममध्ये आईचा रोल ऑफर केला होता. हे ऐकल्यानंतर जुही सुन्न झाली होती. 

 

'टायगर...'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी 
- सलमान खानची नुकतीच प्रदर्शित झालेली फिल्म 'टायगर जिंदा है'ने बॉक्स ऑफिसवर जोरदार डरकाळी फोडली आहे. रिलीजच्या चौथ्या दिवशी फिल्मने 150 कोटींची कमाई केली आहे. अजुनही हा प्रवाह थांबलेला नाही तर वाढत चालला आहे. 

बातम्या आणखी आहेत...