आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानपासून सोनम कपूरपर्यंत, या 8 सेलिब्रिटींनी दिला गंभीर आजाराला लढा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इरफान खानला न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर असल्याचे निदान झाले आहे. स्वतः इरफानने ट्वीट करुन याची माहिती दिली आहे. उपचारांसाठी परदेशी जाणार असल्याचेही इरफानने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.  न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर हा एक जीवघेणा आजार आहे. इरफान या आजारातून लवकरात लवकर बरा व्हावा, अशा सदिच्छा त्याला बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत त्याचे चाहते देत आहेत. इरफानप्रमाणेच बॉलिवूडचे आणखी काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी गंभीर आजाराला लढा दिला आहे. यापैकीच एक अभिनेता म्हणजे सलमान खान. 

 

ट्राईजेमिनल न्यूराल्जियाने त्रस्त होता सलमान खान...
सलमान खान ट्राईजेमिनल न्यूराल्जिया (Trigeminal Neuralgia) नावाच्या आजाराने पीडित होता. यासाठी त्याने दीर्घकाळ उपचार घेतले. या उपचारासाठी तो नेहमी अमेरिकेला जात असतो. हा एक न्यूरोपॅथिक डिसऑर्डर आहे. या आजारात रुग्णाच्या चेह-यावरील काही भागांत (डोक आणि जबडा) खूप दुखतं. सलमान सात ते आठ वर्षे या आजाराने पीडित होता. 


सोनम कपूर 
बॉलिवूडमध्ये फॅशन आयकॉन नावाने ओळखल्या जाणा-या अभिनेत्री सोनम कपूरला कमी वयातच मधुमेह झाला होता. दररोज इन्सुलिनचा डोज घेऊन खास डाएट केल्यानंतर तिने या आजारावर मात केली. कधीकाळी सोनम खूप लठ्ठ होती. मात्र, आता सोनमने या आजारातून मुक्तता केली आहे. तिने लठ्ठपणातूनसुध्दा स्वत:ची सुटका करून घेतली आहे. 


पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून गंभीर आजाराला लढा देणा-या बॉलिवूड सेलिब्रिटींविषयी... 

बातम्या आणखी आहेत...