आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Sanju'विषयी बोलला संजय दत्त, म्हणाला - माझी स्वच्छ प्रतिमा दाखवा असे फिल्ममेकर्सला सांगितले नव्हते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: संजय दत्तच्या 'संजू' या बायोपिकमध्ये त्याची स्वच्छ प्रतिमा दाखवल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. क्रिटिक्सने संजयच्या बायोपिक म्हणजे फक्त चांगली बाजू मांडल्याचे सांगितले आहे. यावर संजयने एका मुलाखतीत नुकतेच स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणाला की, मी फिल्ममेकर्सला सर्व काही सांगितले होते. त्यांना जे योग्य वाटले त्याचा वापर त्यांनी केला. माझी स्वच्छ प्रतिमा दाखवा असे मी त्यांना म्हणालो नव्हतो. संजय म्हणाला की, बायोपिक बनवण्याची आयडिया मान्यताची होती. जेव्हा तो तुरुंगात होता, तेव्हा राजकुमार हिरानी मान्यतासोबत बोलले होते. 


- एका एन्टटेन्मेंट पोर्टलसोबत बोलताना संजय म्हणाला की, - 'एका बंदूकने माझे आयुष्य उध्वस्त केले. जवळ बंदूक ठेवण्याची मोठी किंमत मी मोजली आहे. मी आंतकवादी नाही, प्लीज माझा माफीनामा वाचा.'
- संजय म्हणाला - 'मला आर्म्स अॅक्टनुसार तुरुंगात टाकण्यात आले होते, परंतू मी पळालो नाही. मी परत आलो आणि अरेस्ट झालो.' पोलिसांना दिलेल्या जबाबात संजय म्हणाला होता की, मी माझ्या कुटूंबाच्या सुरक्षेसाठी बंदूक ठेवली होती, कारण मला सतत धमक्या मिळत होत्या.
- मुंबईचा हल्ला आणि बाबरी मस्जित पाडणा-या लोकांकडून आम्हाला धमक्या मिळत होत्या.
- डायरेक्टर राजकुमार हिरानीच्या 'संजू' चित्रपटातने आतापर्यंत बॉक्सऑफिसवर जवळपास 326 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटात रणबीर कपूरने संजूची भूमिका साकारली आहे. 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...