आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीला बॉलिवूडमध्ये आणणार नाही संजय दत्त, विदेशात राहते यांच्यासोबत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 24 एप्रिलला संजय दत्तच्या बायोपिकचा पहिला टीजर रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर त्याचा रील लाइफ रोल प्ले करतोय. चित्रपटांमध्ये त्याच्या पत्नीपासून तर मुलांचा उल्लेख करण्यात आलाय. संजय मुंबईमध्ये आपली तिसरी पत्नी मान्यता, मुलगी इकरा आणि मुलगा शहरानसोबत राहतो. तर त्याला अजून मुलगी त्रिशाला आहे. ती त्याच्यासोबत राहत नाही. ती न्यूयॉर्कमध्ये आपल्या मावशीसोबत राहते. त्रिशाला 29 वर्षांची आहे आणि बॉलिवूडपासून दूर राहते. 


फॅशन वर्ल्डमध्ये आजमावले आहे नशीब
- संजय आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची मुलगी त्रिशाला सध्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावतेय.
- 2014 मध्ये तिने आपली पहिली ड्रीम ट्रेसेज हेयर एक्सटेंशन लाइन सुरु केली होती. न्यूयॉर्कच्या जॉन जे कॉलेज ऑफ क्रिमिनल जस्टिसमधून तिने लॉमध्ये ग्रॅज्यूएशन केलेय.
- संजय आणि रिचा शर्माने 1987 मध्ये लग्न केले होते. तर त्रिशालाचा जन्म 1988 मध्ये झाला होता. रिचाला ब्रेन ट्यूमर होता. यामुळे 10 डिसेंबर, 1996 मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. आईच्या मृत्यूनंतर त्रिशाला न्यूयॉर्क न्यूयॉर्कमध्ये आपल्या मावशीकडे राहायला गेली होती. 

त्रिशाला चित्रपटात येऊ नये असे संजयला वाटते
- संजयने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्रिशालाने चित्रपटात यावे असे त्यांना वाटत नाही. त्यांना वाटायचे की, त्रिशालाने चांगली शाळा आणि कॉलेजमध्ये आपले करिअर बनवावे. एखाद्या दूस-या फील्डमध्ये करिअर करावे.
- संजयने चित्रपटात येण्यासाठी खुप मेहनत केली आहे. संजय म्हणाला होता की, चित्रपटात येण्यासाठी इंडस्ट्रीची भाषा यायला हवी. हे ग्लॅमरचे जग आहे. येथे काम करणे सोपे नसते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा संजय दत्तची मुलगी त्रिशालाचा ग्लॅमरस Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...