आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या बॉम्ब ब्लास्ट नंतर संजय म्हणाला होता- माझ्या शरीरात मुस्लिम रक्त वाहतेय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : संजय दत्तचा बायोपिक 'संजू' या चित्रपटाचा ट्रेलर आणि दोन गाणे समोर आले आहेत. हा चित्रपट 29 जूनला रिलीज होणार आहे. चित्रपटात संजयची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. रणबीरचा लूक आणि अभिनयाची मोठ्या प्रमाणात प्रशंसा होत आहे. चित्रपटामध्ये संजय दत्तच्या पर्सनल आयुष्यासंबंधीत अनेक न एकलेले किस्से पाहायला मिळणार आहेत. यामध्ये एक किस्सा म्हणजे, संजय दत्तचे नाव 1993 मध्ये मुंबई बॉम्ब ब्लास्टमध्ये आले होते. यासिर उस्मान यांच्या 'द क्रेझी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवूड्स बॅड बॉय संजय दत्त' या पुस्तकात या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 


संजय दत्त म्हणाला होता - माझ्या शरीरातही मुस्लिम रक्त आहे...

- संजय दत्तची इमेज बॅड बॉयची आहे. ब्लास्टनंतर पोलिस हा प्लान तयार करणा-याचा तपास करत होते. तेव्हा पोलिसांना कळाले की, यामध्ये बॉलिवूडच्या काही लोकांचा समावेश आहे. पोलिसांनी संशय घेत प्रोड्यूसर हनीफ कडावाला आणि समीर हिंगोराला विचारपूस केली. यावेळी संजय दत्त या जोडीने प्रोड्यूस केलेला चित्रपट 'सनम' मध्ये काम करत होता.
- पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर हनीफ सुरुवातीला उत्तर देणे टाळत होता. परंतू नंतर ते जास्त काळ गोष्टी लपवून ठेवू शकले नाही. यानंतर संजय दत्तचे नाव समोर आले.
- संजय त्यावेळी मॉरीशसमध्ये 'आतिश' चित्रपटाची शूटिंग करत होता. शूटिंग संपवल्यानंतर तो मुंबईत परतला तेव्हा जवळपास 100 पोलिक त्याला घेण्यासाठी एयरपोर्टवर आले होते. त्याला एयरपोर्टवरुन सरळ मुंबई क्राइम ब्रांचमध्ये नेण्यात आले.

 

एके 56 असल्याचे कबूल केले 
विचारपूस दरम्यान संजय दत्तने सर्व आरोप फेटाळून लावले. परंतू हनीफ-समीरला समोर केल्यानंतर त्याच्या जवळ लपवण्यासारखे काहीच राहिले नाही. त्याने कबूल केले की, त्याच्या जवळ एके 56 आहे. यानंतर त्याच्यावर डाटा अॅक्ट लावण्यात आला. मुलाच्या या कामांमुळे सुनील दत्त हैरान होते. त्यांना यावर विश्वास बसला नाही. संजयने वडिलांना सांगितले की, दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने त्याला काही शस्त्र दिले होते. सुनील यांनी विचारले की, हत्यार का घेतले? संजयने उत्तर दिले की, 'माझ्या शरीरात मुस्लिम रक्त वाहतेय...मुंबईमध्ये जे काही होतेय ते मी सहन करु शकत नाही.' मुलाची ही रिअॅक्शन पाहून सुनील सुन्न झाले.
 

 

बातम्या आणखी आहेत...