आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sanjay Dutt Special Cameo In Sanju With Ranbir Kapoor Still Got Viral From Screening

Sanju मध्ये संजय दत्तचा कॅमिओ, फिल्मच्या स्पेशल स्क्रिनिंगमधून लीक झालेला फोटो व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड डेस्कः 'संजू' या संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटात संजय दत्तला घ्यावे की नाही, या द्विधामनःस्थिती चित्रपटाचे दिग्दर्शक राजू हिराणी होते. पण आता संजयने त्याच्या बायोपिकवर आधारित चित्रपटात कॅमिओ केल्याचे उघड झाले आहे. चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग बुधवारी मुंबईत झाले. या स्क्रिनिंगला उपस्थित एका अज्ञात व्यक्तीने चित्रपटातील संजय आणि रणबीरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यावरुन संजय दत्तने या चित्रपटात कॅमिओ केल्याचे समोर आले आहे. 


काय आहे व्हायरल फोटोत...  
व्हायरल फोटोत संजय आणि रणबीर बसलेले दिसत आहेत. दोघांच्याही  हातात वृत्तपत्र असून ते एकमेकांकडे बघत आहेत. या फोटोत रणबीर संजयच्या नव्हे तर त्याच्या ओरिजिनल लूकमध्ये दिसतोय.

- फोटोत मागे डान्सर्स दिसत आहेत. यावरुन संजय आणि रणबीरवर चित्रपटात गाणे चित्रीत झाल्याचे दिसत आहे.

 

...म्हणून संजय दत्तचा कॅमिओ... 
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक राजकुमार हिराणींनी सांगितले होते, की प्रेक्षक या चित्रपटात नक्कीच संजय दत्तला बघण्यास इच्छूक असतील. जेव्हा तुम्ही एखाद्या बायोपिकमध्ये रिअल कॅरेक्टर आणता, तेव्हा तुम्ही प्रेक्षकांना पुरावा देता, की तुमचे विचार वास्तविकतेपक्षा खूप वेगळे आहेत.

 

फिल्ममध्ये संजयच्या आयुष्यातील महत्त्वाचे 7 लोक...
'संजू' या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील अतिशय जवळच्या सात लोकांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये वडील सुनील दत्त, आई नर्गिस, बहीण प्रिया दत्त, मित्र परेश घेलानी, पहिली पत्नी रिचा शर्मा, तिसरी पत्नी मान्यता दत्त यांचा समावेश आहे. 
- या चित्रपटात रणबीरसह परेश रावल, मनीषा कोइराला, अनुष्का शर्मा, सोनम कपूर, दीया मिर्झा, जिम सर्भ, विक्की कौशल, अदिति सिया मुख्य भूमिकेत आहेत.  

बातम्या आणखी आहेत...