आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B-ग्रेड चित्रपटात झळकली संजय दत्तची पत्नी, अशी झाली दिलनवाज शेखहून मान्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय दत्तसोबत मान्यता, दुसरीकडे बी ग्रेड फिल्म 'लवर्स लाइक अस'च्या सीन्समध्ये  मान्यता दत्त - Divya Marathi
संजय दत्तसोबत मान्यता, दुसरीकडे बी ग्रेड फिल्म 'लवर्स लाइक अस'च्या सीन्समध्ये मान्यता दत्त

मुंबईः अभिनेता संजय दत्तच्या खासगी आयुष्यावर बेतलेल्या 'संजू' या चित्रपटाचा टीजर अलीकडेच रिलीज झाला. चित्रपटात रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारतोय. चित्रपटात रणबीर हुबेहुब संजय दत्तसारखा दिसतोय. चित्रपटात संजयची पत्नी मान्यताची भूमिका दीया मिर्झा साकारत आहे. संजयच्या भूमी या चित्रपटाच्या सेटवर त्याची पत्नी मान्यता दोन्ही मुलांसोबत कायम दिसायची. संजयने मान्यताबरोबर फेब्रुवारी 2008 मध्ये लग्न केले होते. 

 

'B' ग्रेड चित्रपटात झळकली आहे मान्यता.. 
22 जुलै 1979 रोजी मुंबईत एका मुस्लिम कुटुंबात मान्यताचा जन्म झाला. तिचे खरे नाव दिलनवाज शेख आहे. मात्र ती लहानाची मोठी झाली ते दुबईत. दुबईतून मुंबईत आलेल्या मान्यताला सक्सेसफुल अॅक्ट्रेस बनायचे होते. पण तिला एकही मोठी भूमिका मिळाली नाही. त्यामुळे ती 'B' ग्रेड चित्रपटांत काम करायला लागली होती.

 

अशी झाली होती, संजय दत्त आणि मान्यताची पहिली भेट..
मान्यता आणि संजय दत्तची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करु लागले आणि मान्यताने चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. मान्यताने 2005 मध्ये  'लव्हर्स लाइक अस' या बी ग्रेड चित्रपटात काम केल्याची कल्पना संजय दत्तला होती. पण तिने अशा चित्रपटांत काम करु नये, हे संजयचे मत होते.

 

20 लाखांत खरेदी केले होते चित्रपटाचे हक्क
संजय दत्तने मान्यताच्या या चित्रपटाचे राइट्स 20 लाखांत खरेदी केले होता. मान्यताच्या प्रेमात तो एवढा आकंठ बुडाला होता की, त्याने मार्केटमधून या चित्रपटाच्या सीडी आणि डीव्हीडी हटवण्यासाठी सगळी शक्ती पणाला लावली होती. 

 

पुढील स्लाइड्सवर.. मान्यताच्या आधी हिच्याशी होते संजय दत्तचे अफेयर..

बातम्या आणखी आहेत...