आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेलमध्ये संजय दत्तला नग्नावस्थेत केले होते उभे, डोके आपटत केला होता आत्महत्येचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - संजय दत्तचा आगामी चित्रपट संजू चे ट्रेलर रिलीज झाले आहे. 3.4 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर, संजय दत्तची पूर्ण जीवन प़द्यावर उतरवताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये रणबीर न्यूडही दिसत आहे. ट्रेलरमध्ये चौकशीच्या वेळी संजय दत्तचे पूर्ण कपडे उतरवण्यात आले होते. इतकेच नाही तर तुरुंगात असताना संजय दत्तने तुरुंगातील सळ्यांवर डोके आपटून आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.  हे सर्व सीन संजू च्या ट्रेलरमध्ये टाकण्यात आले आहेत. यामुळे तुरुंगात गेला होता सलमान खान...

 

1993 साली 12 मार्च रोजी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता आणि त्यात अनेकजणांची नावे समोर आली होती. संजय दत्तला अबू सालेम, रियाज सिद्दीकी यांच्याकडून अवैध बंदुका घेणे, घरात बाळगणे आणि नंतर त्या नष्ट केल्याचा आरोप लावण्यात आला होता. टाडा न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारावर हत्यार त्या बॉम्बब्लास्टचा हिस्सा होते असे मानण्यात आले.


- संजय दत्तने न्यायालयात दिलेल्या जबाबात सांगितले की, मी माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठई परेशान होतो आणि याच कारणामुळे मी हे हत्यारे घरात ठेवली. मी घाबरलो होतो आणि काही लोकांचे बोलणे मी ऐकले आणि ती चूक माझ्याकडून घडली.

 

जामिनावर सुटल्यानंतर संजयने केले चित्रपटात काम...
- 1993 पर्यंत संजय 'थानेदार', 'सडक', 'साजन' आणि 'खलनायक' या चित्रपटांत काम करुन तो सुपरस्टार बनला होता. 1993 साली त्याला अटक करण्यात आली आणि 1995 साली त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आमि त्यानंतर दोनच महिन्यात त्याला पुन्हा अटक करण्यात आली.


- संजय दत्तच्या सुटकेसाठी वडील सुनील दत्त यांनी खूप प्रयत्न केले, समाजवादी पार्टीचे नेता अमर सिंह, शिव सेना सुप्रीमो बाळासाहेब ठाकरे आणि अनेक बॉलिवूड कलाकारांनी संजय दत्तच्या बाजूने जबाब दिले. मोठी न्यायालयीन प्रक्रिया लढल्यानंतर 1997 साली त्याला पुन्हा जामिन मिळाला. 
- दोन वर्षाचा हा कालावधी खूप मोठा होता आणि यादरम्यान वडील सुनील दत्त यांनी त्यांच्या राजकारणी जीवनात आणि संजय दत्तने त्याच्या करिअरमध्ये खूप काही गमावले होते. आता संजय दत्तच्या केसची सुनावणी 2006 साली होणार होती.  
- 1997 पासून 2006 सालापर्यंत संजयने अनेक चित्रपटात काम केले त्यात 'दुश्मन', 'वास्तव', 'कांटे', 'मुन्नाभाई एमबीबीएस' 
'परिणीता' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. 
- 31 जुलै 2007 साली टाडा कोर्टाने त्याला 6 वर्षांची शिक्षा सुनावली आणि संजयची रवानगी तुरुंगात करण्यात आली. 

 

जेलमध्ये असताना संजयच्या करिअरमध्ये आली उतरती कळा..
- संजय दत्तचे जेलमध्ये जाणे आणि बाहेर येणे सतत सुरुच होते. 2007 साली संजयचा चित्रपट 'लगे रहो मुन्नाभाई' सुपरहिट झाला आणि त्याने  'शूटआउट एट लोखंडवाला' मध्ये एका प्रामाणिक पोलीस ऑफिसरची भूमिका केली. 2009 साली संजयला समाजवादी पार्टीकडून लोकसभा निवडणुका लढवण्याचा प्रस्ताव आला जो त्याने फेटाळला.
- यानंतर त्याच्या करिअरला परत उतरती कळा लागली आणि 2013 साली संजय दत्तला आरोपी ठरवत त्याला पाच वर्षआची शिक्षा सुनावण्यात आली. संजयने यावेळी तो एका राजकारणी घरातील असल्याने त्याला जास्त टार्गेट केले जात असल्याचा आरोपही केला.
संजयच्या जेलमध्ये जाण्याने विधु विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी (पीके), के एस रविकुमार (पुलिसगिरी), रेन्सिल डिसिल्वा (उंगली) आणि अपूर्वा लाखिया (जंजीर) यांसारख्या निर्मात्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. 
- यामुळे कोर्टाने संजयला सरेंडर करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आणि संजय दत्तने त्याचे राहिलेले चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. 
- फेब्रुवारी 2016 साली संजयला ठरवलेल्या दिवसांच्या 105 दिवस अगोदरच पुणे येथील येरवडा तुरुंगातून चांगल्या आचरणामुळे लवकर सोडून देण्यात आले.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, संजू चित्रपटाच्या ट्रेलरचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...