आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birthday Special : शाहरुखच्या लाडक्या लेकीचे बालपणीचे फोटोज होत आहेत व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना 22 मे रोजी 18 वर्षांची झाली. 22 मे 2000 रोजी मुंबईत जन्मलेल्या सुहानाने मुंबईतील धीरुभाई अंबानी शाळेतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. सुहानाच्या 18 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने संजय कपूरची पत्नी महिप कपूरने तिची मुलगी शनाया आणि सुहानाचे बालपणीचे काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये पाच वर्षांची सुहाना अतिशय क्यूट दिसतेय. सुहाना आणि शनाया या दोघी बालपणीच्या मैत्रिणी असून दोघींमध्ये स्ट्राँग बाँडिंग आहे. दोघींमधील हे स्ट्राँग बाँडिंग त्यांच्या बालपणीच्या छायाचित्रांमध्ये दिसत आहे. 


चंकी पांडे आणि संजय कपूरच्या मुलींची बेस्ट फ्रेंड आहे सुहाना...
- चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूर सुहानाच्या बेस्ट फ्रेंड्स आहेत. तिघी अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसत असतात. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात शाहरुखच्या वाढदिवसाच्या दिवशी या तिघीही अलीबागमध्ये एन्जॉय करताना दिसल्या होत्या.


डान्सिंग आणि स्पोर्ट्सची आहे सुहानाला आवड...
सुहानाला डान्सिंग आणि स्पोर्ट्सची विशेष आवड आहे. सुहाना स्टेट लेव्हलवर तायक्वांडो स्पर्धेत सहभागी झाली आहे. याशिवाय शाळेच्या स्पोर्ट्स इव्हेंटमध्येही ती सहभागी व्हायची. सुहानाने एक उत्कृष्ट डान्सर बनून जगभरात नाव कमवावे, अशी शाहरुखची इच्छा असून मुलाखतींमध्ये त्याने त्याची ही इच्छा अनेकदा बोलूनही दाखवली आहे.


चुकीचे काम केल्यावर वडिलांना टोकत असते सुहाना...
शाहरुख खानने अनेकदा सुहानासोबतचे बाँडिंग शेअर केले आहे. एका मुलाखतीत शाहरुखने कबुली दिली होती, की तो त्याच्या मुलीला फार घाबरतो. सुहाना अतिशय समजूतदार मुलगी असून चुकीचे काम केल्यावर ती मला कायम टोकत असल्याचे शाहरुख म्हणाला होता. शाहरुख सुहाना लहान असताना अनेकदा तिला त्याच्या चित्रपटांच्या सेटवर घेऊन जात असे.  


पुढील स्लाईड्सवर बघा, सुहाना आणि तिच्या बेस्ट फ्रेंड्सचे बालपणीचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...