आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
मुंबईः शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नाचा आज तिसरा वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 7 जुलै 2015 रोजी दोघांचे अरेंज मॅरेज झाले होते. या दाम्पत्याला एक मुलगी असून मीशा हे तिचे नाव आहे. विशेष म्हणजे शाहिद आणि मीरा आता दुस-यांदा आईबाबा होणार आहेत. लवकरच त्यांचे दुसरे अपत्य या जगात येणार आहे.
खरं तर करीना कपूरसोबतचे शाहिदचे अफेअर बरेच गाजले होते. पण त्यानंतर शाहिदने फिल्म इंडस्ट्रीतील एखाद्या अभिनेत्रीऐवजी सर्वसामान्य तरुणीची जोडीदाराच्या रुपात निवड केली. शाहिदचे आईवडील पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक (सावत्र आई) यांनी शाहिदसाठी मीराला पसंत केले होते. पण मीराने शाहिदसोबत सहजासहजी लग्नाला होकार दिला नव्हता. लग्नाच्यासाठी मीराने त्याच्याकडे एक अट ठेवली होती.
मीराने शाहिदसमोर ठेवली होती ही अट...
स्वतः शाहिद कपूरने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. ती अट मान्य केल्यानंतरच मीराने लग्नासाठी होकार दिल्याचे शाहिदने सांगितले होते. ही अट म्हणजे मीराने शाहिदला त्याचे केस पूर्वीसारखे करायला सांगितले होते. या दोघांची पहिली भेट 'उडता पंजाब' या सिनेमाच्या शूटिंगच्या काळात झाली होती. त्यावेळी शाहिदने भूमिकेसाठी त्याचे केस वाढले होते. लग्नापूर्वी वाढलेले केस कापूने ते पुर्वीसारखे करावे, असे मीराने शाहिदला सांगितले होते. शाहिदने तिचे म्हणणे मान्य केल्यानंतर मीराने लग्नासाठी होकार दिला होता. केस कलर्ड असू नये, असे ती म्हणाली होती. मीराने त्याच्याकडून प्रॉमिस घेतले होते, की जेव्हा आपले लग्न होईल, तेव्हा केसांचा कलर नॉर्मल असावा. इतकेच नाही तर मीराने त्याला स्पष्ट बजावले होते, की लग्नाच्या दिवशी केसांचा कलर लाल तर असूच नये. जेव्हा महिन्याभरानंतर आमचे लग्न झाले, तेव्हा मीराने सांगितल्याप्रमाणेच माझा डिसेंट लूक होता, असे शाहिद म्हणाला होता.
जेव्हा शाहिदला पहिल्यांदा बघून घाबरले होते त्याचे सासरेबुवा...
याच मुलाखतीत शाहिदने पुढे सांगितले होते, की तो आणि मीरा लग्नापूर्वी कधीही डेटवर गेले नव्हते. केवळ तीन ते चार भेटीतच दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. शाहिद सांगतो, ''जेव्हा मीराशी पहिली भेट झाली होती, त्यावेळी मी उडता पंजाबसाठी तयारी करत होतो. मला आठवतं, की जेव्हा मी पहिल्यांदा तिच्या दिल्लीस्थित फार्म हाऊसमध्ये तिला भेटायला गेलो होते, तेव्हा मी उडता पंजाबमधील टॉमी जोन (लांब केस, पोनीटेल वीयर्ड शूज, टॅटूज) च्या लूकमध्ये होतो. मीराच्या वडिलांनी माझे वेलकम करण्यासाठी दार उघडताच, ते माझा हा लूक बघून घाबरुन गेले होते. ते दचकून म्हणाले, अरे देवा! माझी मुलगी तुझ्याशी लग्न करणारेय. त्यानंतर त्यांनी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि काहीतरी बडबडले.''
जेव्हा मीरा म्हणाली, टॉमी माणसाचे नव्हे कुत्र्याचे नाव आहे...
शाहिदने पुढे सांगितले, मला आठवतं जेव्हा मी मीराला सांगितले, की मी केस कलर्ड करणार आहे, तेव्हा तिचा चेहरा बघण्यासारखा होता. सिनेमात टॉमी नावाचे कॅरेक्टर करणार असल्याचे मी तिला सांगितले. तेव्हा ती म्हणाली होती, हे माणसाचे नाही तर कुत्र्याचे नाव आहे.
मीरापेक्षा वयाने 13 वर्षांनी मोठा आहे शाहिद...
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या वयात 13 वर्षांचे अंतर आहे. असे म्हटले जाते, की सुरुवातीला मीरा शाहिदसोबत लग्नास तयार नव्हती. कारण होते त्यांच्या वयात असलेले अंतर. लग्नाच्यावेळी शाहिद 34 वर्षांचा तर मीरा केवळ 21 वर्षांची होती.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, शाहिद आणि मीराच्या मेंदी, लग्न आणि रिसेप्शनची निवडक छायाचित्रे...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.