आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का-विराटवर बॉलिवूडमधून होतोय शुभेच्छांचा वर्षाव, शाहरुख म्हणाला - \'रब ने बना दी जोडी\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता शाहरुख खानचे ट्वीट. - Divya Marathi
अभिनेता शाहरुख खानचे ट्वीट.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा 11 डिसेंबर रोजी इटलीच्या टस्कनी प्रांतातील बोर्गो फिनेशिटो रिसॉर्टमध्ये विवाहबद्ध झाले. खरं तर या दोघांनी आपल्या लग्नाविषयी प्रचंड गुप्तता बाळगली होती. या लग्नाला सचिन-शाहरुखसह केवळ 50 लोकांनाच निमंत्रण करण्यात आले होते. लग्नानंतर स्वतः विराटने लग्नाचा फोटो ट्वीट करुन लग्नाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. ही बातमी येताच चाहत्यांसोबतच बॉलिवूडकरांनी विराट-अनुष्कावर शुभेच्छांचा वर्षाव केला. 


शाहरुख खान, अमिताभ बच्चन, श्रीदेवी, प्रियांका चोप्रा, शाहिद कपूर, अनिल कपूर, वरुण धवन, अभिषेक बच्चन, परिणीती चोप्रा, अनुपम खेर, यांसह अनेक सेलिब्रिटींनी या न्यू मॅरीड कपलला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. रब ने बना दी जोडी या चित्रपटातील अनुष्काचा को-स्टार आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने विराट-अनुष्काचा लग्नाचा फोटो ट्वीट करुन लिहिले, "ही आहे खरी रब ने बना दी जोडी. दोघांना खूप प्रेम, देव तुम्हाला कायम आनंदी ठेवो."

 

> बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अनुष्का-विराटला शुभेच्छा देताना लिहिले, 'विराट-अनुष्का तुम्हा दोघांना आयुष्यातील हा सर्वात सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.'   


> अभिनेत्री श्रीदेवीने लिहिले, "खूप खूप शुभेच्छा. ही पार्टनरशिप कायम राहो. गॉड ब्लेस."

 

> अभिनेता शाहिद कपूर लिहितो, "वंडरफुल, दोघांच्याही कुटुंबीयांना खूप खूप शुभेच्छा."

 

> अभिनेता अनिल कपूरने ट्वीट केले, "नवदाम्पत्याला खूप खूप शुभेच्छा. कायम सोबत राहा." 


पुढील स्सालईड्सवर वाचा, क्यूट कपलला बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिलेल्या शुभेच्छा...  

बातम्या आणखी आहेत...