आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखसोबत आहे सुहानाचे खास बॉन्डिंग, बघा Childhood Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : शाहरुख खानसाठी मंगळवार हा सेलिब्रेशनचा दिवस आहे. कारण आज त्याच्या मुलीचा 18 वा वाढदिवस आहे. सुहाना खानचा जान्म 22 मे, 2000 ला मुंबईत झाला. सुहाना वडील शाहरुख खान याची लाडाची लेक आहे. आज ती 18 वर्षांची झाली. यामुळे शाहरुख खान जंगी सेलिब्रेशन करणार असल्याचे दिसतेय. रिपोर्ट्सनुसार गौरी खान आणि शाहरुख खानने मुलीचा 18 वा वाढदिवस सेलिब्रेट करण्याचा प्लानही बनवला आहे.


मॅगझीन कव्हरवर येणार सुहाना...
अभिनयाची आवड असणारी सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पाउल ठेवणार आहे. याचा खुलासा आई गौरी खानने स्वतः एका इव्हेंटमध्ये केला होता. गौरीला एका अवॉर्ड शोमध्ये सुहानाविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, गौरी सध्या एका मॅगझीन फोटोशूटच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. पण तिने मॅगझीनचे नाव रिव्हील केले नव्हते. हे सुहानाचे पहिले फोटोशूट असणार आहे. सूत्रांनुसार सुहाना पुढच्या महिन्याच्या एका मॅगझीन कव्हरवर दिसणार आहे.

सुहानाने धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलेय. तिला डान्सिंग आणि स्पोर्ट्स खुप जास्त आवडते. ती शाळेतील अनेक स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये सहभागी होत असते. शाहरुखला वाटते की, तिने चांगली डान्सर बनवून जगभरात त्याचे नाव मोठे करावे. सध्या सुहाना लंडनमध्ये शिक्षण घेतेय. सुहाना सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह राहते. तिने फ्रेंड्ससोबत पार्टी एन्जॉय करतानाचे फोटोज आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेले आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शाहरुख खानची लेक सुहानाचे बालपणीचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...