आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आला शाहरुखच्या मुलीचा फोटो, 'कॉलेज फ्रेंड'सोबत दिली अशी पोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोमध्ये सुहाना एका मुलाच्या गळ्यात हात घातलेली दिसतेय. हा फोटो सुहानाच्या एका फॅनने पोस्ट केला आहे. हा एका पार्टीतील फोटो आहे. फॅन पेजवर पोस्ट केलेला हा ब्लॅक अँड व्हाइट फोटो 18 जूनचा आहे. या फोटोवर 'Eid Mubarak To everyone ❣️❤️ #tb Suhana with a friend in party🌸💐😚#SuhanaKhan'. असे लिहिले आहे. सुहानाचे फॅन या मुलाला तिचा कॉलेज फ्रेंड असल्याचे सांगत आहेत. सुहानाचा हा फोटो थोडा वेगळा आहे. कारण सामान्यतः ती गर्लगँगसोबत दिसते. मुंबईच्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुहानाचे शिक्षण झालेय. सध्या ती लंडनच्या Ardingly कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. तिचा हा फोटोही तिथलाच आहे.


बॉलिवूडमध्ये येऊ शकते सुहाना
- सुहाना खानला अॅक्टिंग आणि स्पोर्ट्सचा शौक आहे. तिने अनेक थिएटर प्ले केले आहे. शाहरुख खानने म्हटले होते की, सुहाना बॉलिवूडमध्ये येऊ शकते. पण तिला स्पोर्ट्समध्ये जायचे असेल तरीही माझा तिच्यावर काहीच दबाव नाही. सुहाना याच महिन्यात एका मॅगझीन कव्हर पेजवर झळकणार आहे. याविषयीची माहिती तिची आई गौरी खानने दिली होती. 
- शाहरुख खान सध्या आपला आगामी चित्रपट 'झीरो'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात शाहरुख खानसोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपट याचवर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होईल.

बातम्या आणखी आहेत...