आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटातील व्हिलेन पाहून शक्ती कपूरने मांडले दुःख, म्हणाले- खलनायक संपला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : अनेक चित्रपटात व्हिलेनची भूमिका साकारलेल्या शक्ती कपूरकडे सध्या कोणताच चित्रपट नाही. नुकतेच ते 'हाई फीवर... डांस का नया तेवर' या टीव्ही शोमध्ये पोहोचले होते. यावेळी बोलताना ते सध्याच्या काळातील चित्रपटातील व्हिलेनची परिस्थिती पाहून दुःखी झाले. ते म्हणाले की, आता चित्रपटातून व्हिलेन गाबय झाले आहेत. शक्ती म्हणाले की, आता चित्रपटांमध्ये व्हिलेनचाही रोमँटिक सीक्वेंस असतो.


शक्ती कपूरने बातचीत करताना सांगितले की, सिनेमाचा ट्रेंड आता बदलला आहे. नव्या काळातील चित्रपटांमधून आता व्हिलेन्स गायब होत आहेत. ते म्हणाले की, आता हीरोच चित्रपटात व्हिलेनची भूमिका करतात. आता हिरो प्रत्येक रोल करत आहे हे चांगले आहे. परंतू आता चित्रपटातील व्हिलेनचे स्थान नष्ट झाले आहे.


शक्ती कपूरने या चित्रपटांमध्ये केले काम
शक्तीने चित्रपटांमध्ये व्हिलेनसोबतच कॉमेडिअनची भूमिकाही साकारली आहे. त्यांनी 100 चित्रपटात कादर खानसोबत कॉमेडी केली आहे. शक्ती कपूरने 'लूटमार', 'कुर्बानी', 'कीमत', 'नसीब', 'वारदात', 'रॉकी', 'हीरो', 'जानी दोस्त', 'हम है लाजवाब', 'गिरफ्तार', 'इंसाफ', 'जान हथेली पे', 'गुरु', 'अंदाज अपना अपना', 'आग का गोला' सोबतच जवळपास 700 चित्रपटांमध्ये काम केलेय.

बातम्या आणखी आहेत...