आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुर्वाश्रमीचे पती, बहिणीचे झाले होते निधन, आता या अभिनेत्रीच्या कुटुंबात कुणीच राहिले नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री शम्मी आंटी यांचे वयाच्या 89 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. 40 च्या दशकात करिअरची सुरुवात करणा-या शम्मी यांनी 2012 पर्यंत सिनेसृष्टीत काम केले. त्यांनी जवळजवळ 200 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. 1931 मध्ये पारसी कुटुंबात जन्मलेल्या शम्मी आंटी यांचे खरे नाव नर्गिस रबाडी होते.


आता कुणीच राहिले नाही कुटुंबात...
- शम्मी यांचे वडील पारसी मंदिर Agyari मझ्ये पुजारी होते. शम्मी तीन वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते.
- शम्मी यांच्या आई पारसी सणांना स्वयंपाक करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. त्यांची थोरली बहीण मणी रबाडी फॅशन डिझायनर होत्या.
- मणी यांनी 1967 ते 1994 याकाळात अभिनयासोबतच चित्रपटांसाठी कॉश्च्युम डिझाइनचे काम केले होते. शम्मी यांच्या मातोश्री आणि थोरली बहीण यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले.
- शम्मी यांच्या खासगी आयुष्याविषयी सांगायचे म्हणजे त्यांनी 1970 मध्ये निर्माते सुल्तान अहमद यांच्यासोबत लग्न केले होते. पण हे लग्न फार काळ टिकले नाही आणि या दोघांचा घटस्फोट झाला.
- निर्माते सुल्तान अहमद यांचेही काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला शम्मी आंटी यांच्याविषयीच्या 8 खास गोष्टी सांगत आहोत... 


शम्मी यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

बातम्या आणखी आहेत...