आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतरसुध्दा शत्रुघ्न यांचे होते या अभिनेत्रीसोबत संबंध, पत्नी पूनमला होते सर्वकाही ठाऊक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आज 72 वर्षांचे झाले आहेत. 9 डिसेंबर 1945 रोजी पाटण्यात जन्मलेले शत्रुघ्न सिन्हा राजकिय क्षेत्रातसुध्दा सक्रिय आहेत. त्यांनी देव आनंद यांच्या 'प्रेम पुजारी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पारस (1971), दोस्त (1974), काला पत्थर (1979), दोस्ताना (1980) सारख्या चित्रपटांमधून आपल्या अनोख्या अभिनयाचा झेंडा रोवणा-या शत्रुघ्न यांचे आयुष्यसुध्दा खूप चर्चित राहिले आहे. विशेषतः पूनम चंडीरामणीसोबत लग्न आणि रिना रॉयसोबतचे अफेअर बी टाऊनमधील चर्चेचा विषय ठले होते. 


7 वर्षे होते रिना रॉयसोबत संबंध... 
शत्रुघ्न यांनी 1980मध्ये माजी मिस यंग इंडिया राहिलेल्या पूनम चंडीरामणी (आता सिन्हा) यांच्याशी लग्न केले. याच काळात शत्रुघ्न यांचे नाव अभिनेत्री रिना रॉयसोबत जुळले होते. एका मुलाखतीत शत्रुघ्न यांनी कबुली दिली होती, की ते सात वर्षे रिनासोबत रिलेशनशिपमध्ये होते. विशेष म्हणजे, शत्रुघ्न यांची पत्नी पूनम यांना या अफेअरविषयी सर्वकाही ठाऊक होते.


पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, शत्रुघ्न यांच्या लग्नाने अचंबित झाल्या होत्या रिना... 

 

बातम्या आणखी आहेत...