आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐकले का... अत्‍यंत कडक शिस्‍तीची आई आहे शिल्‍पा शेट्टी, मुलाला ठेवते साखरेपासून दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिल्‍पा शेट्टीने अनेक भूमिका साकारल्‍या आहेत. अभिनेत्री, रिअॅलिटी शोची परीक्षक आणि दोन पुस्‍तकांच्‍या लेखनापासून आरोग्‍यदायी पाककलांसाठी तिचे स्‍वत:चे यूट्यूब चॅनेल अशा विविध भूमिका तिने पार पाडल्‍या आहेत. एक उत्‍कट योगी आणि सक्रिय माता म्‍हणून ती या सर्व भूमिका अगदी उत्‍साहाने पार पाडते. शिल्‍पाला खाण्याची देखील खूप आवड आहे. ती आठवड्यातून किमान एकदा तरी चमचमीत जेवणाचा आस्‍वाद घेते. पण तिच्‍या आहारामध्‍ये एका घटकाचे प्रमाण कमी असते, तो म्‍हणजे साखर. ती ही गोष्‍ट तिच्‍या मुलामध्‍ये देखील बिंबवण्‍याचा प्रयत्‍न करत आहे.

 

इंफोटेन्‍मेंट चॅनेल 'सोनी बीबीसी अर्थ'च्‍या पहिल्‍या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमादरम्‍यान ती आंतरराष्‍ट्रीय दिग्‍गज डॉ. मायकेल मोस्‍लीसोबत खास अतिथी होती. ती म्‍हणाली, ''साखर देखील एक प्रकाराचे व्‍यसन आहे आणि हे ऐकूनच खूप भयावह वाटते. साखर इतकी धोकादायक आहे की मी माझ्या मुलापासून साखर लांबच ठेवते. आज आपण अशा युगात राहत आहोत, जेथे प्रत्‍येक कॉर्नरमध्‍ये एक-ना-एक मॉल आहेच आणि त्‍या मॉलमध्‍ये लॉलीपॉप्‍स व गोड मिठाई असतातच. ही सर्व मिष्‍ठान्‍ने लहान मुलांना आकर्षून घेतात. पण त्‍यांना कोणते पदार्थ चांगले व कोणते खराब हे समजत नाही.''

 

निश्चितच शिल्पा कडक शिस्‍तीची आई आहे आणि याचा तिच्‍या मुलाला फायदाच होईल याबाबत तिला कोणतीच शंका नाही. ती म्‍हणाली, ''मी त्‍याला समजवते की साखरेमुळे तू आळशी होशील. असे म्‍हणतात, की एक चमचा साखर पुढील सहा तासांसाठी एखाद्याची रोगप्रतिकार शक्‍ती कमी करते. तर मग विचार कर साखरेचा तुझ्या संपूर्ण शरीरावर काय परिणाम होऊ शकतो.'' 'ट्रस्‍ट मी आय अॅम ए डॉक्‍टर' हा कार्यक्रम येत्या 18 जून रोजी सोनी बीबीसी अर्थवर प्रसारित होणार आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, मुलासोबतची शिल्पाची निवडक छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...