आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 43 व्या वर्षीही जबरदस्त फिट आहे शिल्पा शेट्टी, असा आहे वर्कआउट-डायट प्लान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी 43 वर्षांची झाली आहे. 8 जून 1975 रोजी बेंगलुरु, कर्नाटकमध्ये तिचा जन्म झाला. ती बॉलिवूडची सर्वात फिट अॅक्ट्रेसेसमधून एक आहे. तिला इंडस्ट्रीची यम्मी मम्मी म्हटले जाते. ती सुरुवातीला तर फिट होतीच, पण आई झाल्यानंतरी ती एकदम फिट दिसते. ती पहिली अशी अभिनेत्री आहे जिने फिटनेससाठी आपली पावर योगा डीव्हीडी लॉन्च केली. शिल्पानुसार तन आणि मन फिट ठेवण्यासाठी योगा सर्वात चांगली पध्दत आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी शिल्पा काय-काय करते, यावर एक नजर टाकूया.

 

हा आहे शिल्पाचा एक्सरसाइज रुटीन...
स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी शिल्पा प्रत्येक प्रकारची एक्सरसाइज करते. यामध्ये कार्डिओ वर्कआउटपासून स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि योगाचा समावेश आहे. ती आठवड्यातून फक्त पाच दिवस वर्कआउट करते. यामध्ये दोन दिवस योगा, दोन दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि एक दिवस कार्डिओसाठी रिजर्व असतो. स्ट्रेंथ ट्रेनिंगला तिने दोन भागांमध्ये विभागले आहे. एक अपर बॉडी वर्कआउट आणि दूसरे लोअर बॉडी वर्कआउट. स्ट्रेंथ ट्रेनिंग दरम्यान ती मांसपेश्यांना आकार देण्यासाठी हलक्या वजनाऐवजी जड वस्तू उचलणे पसंत करते. एवढेच नाही, तर तणाव कमी करण्यासाठी योगानंतर 10 मिनिटे मेडिटेशन करते.

 

असा आहे शिल्पाचा डायट प्लान
शिल्पा शेट्टी प्रत्येक दिवशी 1800 कॅलरी एनर्जी घेते. त्यांच्या दिवसाची सुरुवात आवळा आणि एलोवेरा ज्यूसने होते. यासोबतच ती लो ग्यासेमिक इंडेक्सचे कार्बोहायड्रेट घेते. पदार्थ तयार कराताना ती ऑलिव्ह ऑइलचा वापर करते. शिल्पाला जास्तीत जास्त नॉनव्हेजिटेरिअन पदार्थ खाणे आवडते. योगा आणि व्यायामानंतर शिल्पाला प्रोटीन शेक घ्यायला आवडते ती आठवड्यातून सहा दिवस खाण्यावर नियंत्रण ठेवते. एक दिवस बाहेर जाऊन ती रेस्तरॉमध्ये जेवते. जेवताना ती स्नॅक्स घेत नाही. कारण तिला वाटते की, यामुळे कॅलरीचे प्रमाण वाढते.

 

असा आहे शिल्पाचा डायट प्लान
ब्रेकफास्ट मध्ये : 1 वाटी दलिया आणि एक कप चहा
वर्कआउटनंतर : प्रोटीन शेक, 2 खजूर, 8 मनुके
लंचमध्ये : तुप लावलेली भाकरी (वाच वेगवेगळ्या पीठांनी तयार झालेली) चिकन, डाळ, रिफाइंड तेलात बनवलेली भाजी
दुपारनंतर : एक कप ग्रीन टी
संध्याकाळी : योगा मिल्क
रात्री : सफरचंद आणि सलाद

 

नोट : हा डायट प्लान आठवड्यातील 6 दिवसांचा आहे, हा डायट प्लान स्वतः शिल्पाने एका प्रसिध्द मॅगजीनला दिलेल्या मुलाखतीत शेअर केला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शिल्पा शेट्टीचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...