आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लवकरच लग्न करणार श्रध्दा कपूर? वडील शक्ती कपूर यांनी सांगितले असे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री श्रध्दा कपूर लवकरच लग्न करणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. तिचे वडील अभिनेता शक्ती कपूर यांनी सांगितले की, श्रध्दा आपल्या पसंतीच्या व्यक्तीसोबत लग्न करेल. शक्ती कपूर आपला आगामी चित्रपट 'द जर्नी ऑफ कर्मा' च्या पोस्टर आणि टीजर रिलीजवेळी पत्रकारांशी बोलत होते.

 

काय म्हणाले शक्ती कपूर
- श्रध्दाच्या लग्नाविषयी विचारल्यावर शक्ती म्हणाले की, "प्रत्येक वडीलांना वाटत असते की, त्याच्या मुलीचे लग्न चांगल्या आणि प्रतिष्ठित घराण्यात व्हावी. मी प्रार्थना करतो की, ती तिच्या वयक्तीक आयुष्यात आणि करिअरमध्ये पुढे जावी. एक वडील म्हणून मला वाटते की, आपल्या मुलांना स्वातंत्र द्यायला हवे. कारण आता पालकांच्या मनाने मुलांनी लग्न करण्याचा काळ गेला आहे."
- पुढे बोलताना शक्ती सांगतात की, "आता आपल्याला त्यांच्या जोडीदाराविषयीची पसंत विचारावी लागते. सध्या ती आपल्या करिअरमध्ये व्यस्त आहे. परंतू तिने कधीही तिच्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न केले तर मला काहीच हरकत असणार नाही."

 

या चित्रपटात काम करतेय श्रध्दा
श्रध्दा सध्या बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहे. शक्ती कपूर म्हणाले की, माझी मुलगी नवनवीन आव्हांना तोंड देऊन मेहनत करतेय यामुळे मला आनंद होतोय. शक्ती कपूरने स्वतःच्या करिअरविषयी सांगितले की, "माझे फिल्मी करिअर खुप चांगले राहिले आणि आणि माझे मुलंही त्यांच्या आयुष्यात चांगले काम करत आहेत. देवाची कृपा आणि देवाचा आशिर्वाद आहे."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रध्दा कपूर आणि शक्ती कपूर यांचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...