आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 वर्षांची झाली शक्ती कपूरची लाडकी लेक, बघा Lifeचे निवडक PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 31 वर्षे पूर्ण केली आहेत. 3 मार्च 1987 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. अभिनेता शक्ति कपूर आणि शिवांगी कपूर यांची मुलगी असलेल्या श्रद्धाने बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण एकेकाळी श्रद्धाला दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. ही गोष्ट तशी फार क्वचित लोकांना ठाऊक आहे. संजय लीला भन्साळींनी श्रद्धाला त्यांच्या 'माय फ्रेंड पिंटो' या सिनेमासाठी कास्ट केले होते. मात्र नंतर तिला या सिनेमातून काढून टाकण्यात आले होते. तिच्या जागी कल्किची वर्णी या सिनेमात लागली. सिनेमातून बाहेर काढण्यात आल्याने श्रद्धा खूप दुःखी होती. त्यामुळे ती तीन दिवस सतत रडली होती.


सिनेमासाठी अर्ध्यावरच सोडले शिक्षण...   
रिपोर्ट्सनुसार, श्रद्धाला बालपणापासूनच अभिनयाची आवड गोती. तिने बोस्टन युनिव्हर्सिटीत ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश घेतला होता.  मात्र याचदरम्यान निर्माती अंबिका हिंदुजा यांनी श्रद्धाला 'तीन पत्ती' या सिनेमासाठी साइन केले आणि श्रद्धाने अर्ध्यावरच शिक्षण सोडून दिले. 'तीन पत्ती'मध्ये श्रद्धाने एका कॉलेज गर्लची भूमिका साकारली होती. या सिनेमात तिच्यासोबत अमिताभ बच्चन, आर माधवन आणि बेन किंग्सले यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.  


'आशिकी 2'ने बनवले स्टार...
श्रद्धा कपूरने 'तीन पत्ती'नंतर दिग्दर्शक पुनीत मल्होत्रांच्या  'लव का द एंड' (2011) या सिनेमात काम केले, मात्र त्यातून तिला ओळख मिळाली नाही. त्यानंतर  मोहित सूरी दिग्दर्शित 'आशिकी 2' या सिनेमात ती झळकली आणि पहिल्यांदा यशाची चव चाखली. या सिनेमासाठी श्रद्धाने यशराज प्रॉडक्शनसोबतचा दोन सिनेमांचा करार मोडला होता. श्रद्धाने 'लव का द एंड' हा सिनेमा साइन केला होता, तेव्हा यशराजसोबत आणखी दोन सिनेमांच करार तिने केला होता. यामध्ये अर्जुन कपूर स्टारर 'औरंगजेब' या सिनेमाचा समावेश होता. जेव्हा  तिला 'आशिकी 2'साठी विचारणा झाली, तेव्हा तिने यशराजसोबतचा करार मोडला. या सिनेमामुळे ती एका रात्रीतून स्टार झाली होती. 


प्रमुख सिनेमे...    
'एक विलेन', 'हैदर', 'ABCD 2' (Any Body Can Dance 2), 'बागी', 'रॉक ऑन-2', 'ओके जानू', 'हसीना द क्वीन' आणि 'हाफ गर्लफ्रेंड' हे श्रद्धाचे प्रमुख सिनेमे आहेत. 


पुढील स्लाईड्सवर बघा श्रद्धाचे खास PHOTOS आणि जाणून घ्या तिच्याशी निगडीत 9 गोष्टी... 

बातम्या आणखी आहेत...