आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच नाही तर बॉलिवूडच्या 11 प्रसिद्ध सेलिब्रिटींचीही Heart Attack ने मालवली प्राणज्योत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेश्री श्रीदेवीचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवीची प्राणज्योत मालवली. या अकाली जाण्याने बॉलिवूड आणि चाहत्या वर्गाकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. आपल्या मनमोहक अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ढोका चुकवणा-या अभिनेत्रीने अचानकच एक्झिट घेतलीय. परंतू हृदयविकाराच्या झटक्याने फक्त श्रीदेवीच नाही तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे निधन झालेय. 

 

सध्याच्या काळात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावणा-यांची संख्या वाढत चालली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची मुख्य जबाबदारी हृदयावर अवलंबून असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायलासुद्धा वेळ नाही. ताण, चिंता, आरोग्याकडे दुर्लक्ष अशा अनेक कारणांमुळे लोकांना ‘हृद्यविकार’ यांसारख्या समस्येला सामोरे जावे लागते. हिंदी सिनेसृष्टीतील अनेक नावाजलेल्या कलाकारांची हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली.

 

इंदर कुमार
बॉलिवूड अभिनेता इंदर कुमार याचे 27 जुलै 2017 मध्यरात्री दोनच्या सुमारास हार्ट अटॅकमुळे निधन झाले होते. तो 44 वर्षांचा होता. अंधेरीतील फोर बंगलो या घरी झोपेतच त्याची प्राणज्योत मालवली होती. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. इंदर कुमार याने 20 चित्रपटांत काम केले होते. सलमान खानबरोबर 'वाँटेड' आणि 'तुमको ना भूल पायेंगे' चित्रपटात त्याच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. इंदर कुमार याची दोन लग्नं झाली होती. पहिल्या लग्नापासून झालेली मुलगी 12 वर्षांची होती तर दुसऱ्या पत्नीपासून झालेली मुलगी अवघ्या 4 वर्षांची होती. खरं तर इंदरला व्यायामाची विशेष आवड होती. पण नियमित व्यायामानंतरसुद्धा त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रिमा लागूसोबतच अजून कोणकोणत्या प्रसिध्द कलाकारांचा हृदयविकाराने मृत्यू झालाय...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...