आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमल हसन यांच्या लेकीपासून ते अनुष्कापर्यंत, सर्जरीनंतर बदलला या 8 अभिनेत्रींचा LOOK

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बऱ्याच चर्चा आणि तर्कवितर्कांनंतर अखेर अभिनेते कमल हसन यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. बुधवारी मदुराईच्या ओथाकडाई मैदानात त्यांनी जनसमुदायासमोर आपल्या नव्या पक्षाची स्थापना करत राजकीय वर्तुळात प्रवेश केला. 'मक्कल निधी मय्यम' नावाच्या पक्षाची घोषणा त्यांनी केली असून, या पक्षाचं चिन्हंही यावेळी सर्वांसमोर सादर करण्यात आलं. मध्यभागी एक तारा आणि त्याभोवती एखाद्या कुंपणाप्रमाणे असणारं हातांच्या साखळीचं चक्र असं एकंदर त्यांच्या पक्षाचं चिन्हं आहे. फिल्मी करिअरमध्ये यशोशिखर गाठल्यानंतर आता हसन यांची राजकीय पटलावर चाल कशी असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

 

कमल हसन यांची लेक आहे अभिनेत्री... 
कमल हसन यांच्याप्रमाणेच त्यांची थोरली मुलगी श्रुती हसन हीदेखील एक अभिनेत्री आहे. 28 जानेवारी, 1986 रोजी जन्मलेली श्रुती आता 32 वर्षांची झाली आहे. साऊथसोबतच तिने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रूती साऊथ चित्रपटांमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने लूक चेंज करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली. श्रुतीने नाकावर शस्त्रक्रिया करुन घेतली आहे. 'वारनम आयिरम' (2008), 'पृथ्वी' (2010), 'उद्यान' (2011), 'येननामो येधो' (2014) सह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. 

 

श्रुतीप्रमाणेच दक्षिणेच्या अनेक अभिनेत्रींनी सौंदर्यात भर घालण्यासाठी प्लास्टिक सर्जरीची मदत घेतली आहे. कोणत्या आहेत या अभिनेत्री जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर....  

बातम्या आणखी आहेत...