आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई: 'तेजाब' या चित्रपटातील 'एक दो तीन...' या गाण्याने प्रसिद्ध झालेल्या गायिका अलका याज्ञिक यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत. 20 मार्च 1966 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या अलका यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी आकाशवाणीवर गाणे सुरु केले होते. प्लेबॅक सिंगिंगसाठी 7 फिल्मफेअर आणि दोनदा नॅशनल अवॉर्ड आपल्या नावी करणा-या अलका यांनी 1989 साली नीरज कपूरसोबत लग्न केले होते. त्यांच्या मुलीचे नाव सायशा कपूर आहे. सायशाने गेल्यावर्षी 25 डिसेंबर रोजी तिचा बॉयफ्रेंड अमित देसाईसोबत साखरपुडा केला. सायशाचे नाव इंडियन आयडॉल फेम राहुल वैद्यसोबत जुळले होते. काही दिवसांपूर्वी सायशाचा हुक्का पितानाचा फोटोसुद्धा व्हायरल झाला होता. अलका याज्ञिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात, त्यांच्या या एकुलत्या एका लेकीविषयी...
सायशाने गायन क्षेत्रात बनवले नाही करिअर...
- 27 वर्षीय सायशा अंधेरी स्थित Boveda Bristro या रेस्तराँची को-ओनर आहे.
- हे रेस्तराँ ती तिच्या एका बालपणीच्या मित्रासोबत चालवते.
- सायशाने लंडन स्कूल ऑफ मार्केटिंगमधून एमबीए पू्र्ण केले आहे. अनेक हॉटेल मॅनेजमेंट कंपनीसोबत सायशा जुळली आहे.
- ग्लॅमर इंडस्ट्रीशी संबंध असूनदेखील सायशाने या इंडस्ट्रीत करिअर बनवले नाही.
- खरं तर सायशाने फिल्म स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता, पण हे विश्व आपल्यासाठी नाही, हे लवकरच तिच्या लक्षात आले आणि तिने ही इंडस्ट्री सोडून हॉटेल इंडस्ट्रीत करिअर करण्याचा निर्णय घेतला.
- विशेष म्हणजे सायशाने आईच्या पावलावर पाऊल ठेवत गायनाचे शिक्षण घेतले आहे. पण ती गायनात फारशी रमत नाही.
- अलका याज्ञिक यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, त्यांनी त्यांच्या मुलीला हव्या त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित केले होते.
25 वर्षांपासून वेगळे राहात आहेत अलका आणि तिचे पती नीरज...
- अलका याज्ञिक आणि शिलाँग बेस्ड बिझनेसमन नीरज कपूर यांच्यासोबत 1989 मध्ये लग्न केले होते.
- लग्नानंतर कामाच्या निमित्ताने अलका सर्वाधिक काळ मुंबईत वास्तव्याला असायची. तर नीरज हे त्यांच्या बिझनेसमुळे शिलाँगमध्ये राहायचे.
- अलका याज्ञिक कामातून जसा वेळ मिळेल तशी शिलाँग जात असे, तर कधी कधी नीरज मुंबईत येत असतं.
- दीर्घकाळ असाच क्रम सुरु होता. याचकाळात त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. अलका आणि नीरज हे दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांनी वेगळे राहून कामावर लक्ष केंद्रित केले. एवढी वर्षे वेगळी राहूनदेखील त्यांच्यातील प्रेम, बाँडिंग मात्र कायम आहे.
- अलका आणि नीरज यांची लेक सायशा आता 27 वर्षांची आहे.
पार्टीत असा असतो सायशाचा अंदाज...
- इतर स्टार किड्सप्रमाणे सायशासुद्धा सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे फॅमिली आणि वेकेशन्सशिवाय पार्टी फोटोज बघायला मिळतात.
- काही फोटोजमध्ये सायशा हुक्का पिताना आणि ड्रिंक्ससोबत पोज देताना दिसतेय.
पुढील स्लाईड्सवर पहिल्यांदाच बघा, सायशा कपूरचे फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतचे निवडक फोटोज
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.