आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Social Media Hilarious Memes On Sanju Teaser संजू, संजय दत्त बायोपिक संजू, रणबीर कपूर

रिलीज झाला संजय दत्तच्या बायोपिकचा टीजर, सोशल मीडियावर लोक उडवत आहेत खिल्ली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता संजय दत्तच्या खासगी आयुष्यावर बेतलेल्या 'संजू' या आगामी चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. 1.25 मिनिटांच्या या टीजरमध्ये रणबीर कपूर संजय दत्तच्या खासगी आयुष्यातील आजवरच्या विविध लूकमध्ये दिसतोय. टीजरची सुरुवात तुरुंगातील दृश्याने होते. पुण्यातील येरवडा तुरुंगातून बाहेर पडत असताना संजू (रणबीर कपूर) त्याच्या आयुष्याविषयी सांगतो. टीजर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर चित्रपटाविषयी फनी कमेंट्स येत आहेत.

 

- एका यूजरने रणबीरच्या लूकवर कमेंट करताना लिहिले, The journey of a #JNU student.

- तर आणखी एका यूजरने संजय दत्तच्या लूकमध्ये रणबीर कपूरला बघून लिहिले, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टिंडर

- एक यूजर लिहितो, आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या वळणावर प्रत्येक जण संजू आहे. 
- एका यूजरने संजय दत्तचे विविध लूकची तुलना वेगवेगळ्या रोल नंबरच्या उत्तरपत्रिकेसोबत करुन फनी कमेंट केले आहे. 


जाणून घ्या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार...
- या चित्रपटात संजय दत्तची पत्नी अर्थातच मान्यता दत्तची भूमिका अभिनेत्री दीया मिर्झा हिने साकारली आहे. तर आई नर्गिसच्या भूमिकेत मनिषा कोइराला आहे. तर संजयच्या पुर्वाश्रमीच्या प्रेयसी टीना मुनीमच्या भूमिकेत सोनम कपूर आणि माधुरी दीक्षितच्या भूमिकेत करिश्मा तन्ना आहेत.
- याशिवाय या चित्रपटात अनुष्का शर्मा, परेश रावल, जिम सर्भ, विकी कौशल, तब्बू आणि बोमन इराणी या कलाकारांनीही काम केले आहे. येत्या 29 जून रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, टीजर रिलीज झाल्यानंतर लोकांच्या आलेल्या Funny कमेंट्स...

बातम्या आणखी आहेत...