आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाक्षी सिन्हाने कमी केले 35 किलो वजन, 'दबंग-3'मध्ये दिसणार New Look

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने इंस्टाग्रामवर आपल्या ट्रान्सफॉर्मेशनचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती तिचे अॅब्स दाखवताना दिसतेय. सोनाक्षी गेल्या काही दिवसांपासून वजन कमी करण्यावर भर देतेय. आता तिने तिचे बरेच वजन कमी करुन स्वतःमध्ये बदल घडवला आहे. तिचा हा नवीन लूक सलमान खानच्या आगामी 'दबंग-3'मध्ये बघायला मिळणार आहे. दबंगच्या दोन भागांमध्ये सोनाक्षीचा वेगवेगळा लूक बघायला मिळाला होता. आता तिस-या भागात तिचे ट्रान्सफॉर्मेशन बघायला मिळणार आहे. दबंग 3मध्ये सोनाक्षीच सलमानच्या अपोझिट झळकणार असल्याचे चित्रपटाचा दिग्दर्शक अरबाज खान आणि निर्माता प्रभूदेवा यांनी कन्फर्म केले आहे.


आतापर्यंत कमी केले 35 किलोंहून अधिक वजन...
- सोनाक्षी वर्कआउटमुळे पुर्वीपेक्षा स्लिमट्रीम झाली आहे. ती दररोज जिममध्ये वर्कआऊट करते आणि लिमिटेड डाएट घेते. असे करुन तिने आतापर्यंत 35 किलोंहून अधिक वजन कमी केले आहे.
- बॉलिवूडमध्ये करियर सुरु करण्यापूर्वी सोनाक्षीचे वजन तब्बल 90 किलो होते.  2010 मध्ये तिला सलमान स्टारर दबंग चित्रपटाची ऑफर मिळाली, त्यानंतर सोनाक्षीने तिचे तब्बल 30 किलो वजन कमी केले होते.
- सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीपर्यंत सोनाक्षीने तिचे वजन कमी करण्याविषयी कधीही विचार केला नव्हता. एका मुलाखतीत ती म्हणाली होती, की मी सलमान खानची आभारी आहे, त्यानेच मला वजन कमी करण्यासाठी मोटिव्हेट केले.
- सलमानच्या सांगण्यावरुनच स्वतःवर लक्ष दिले आणि वजन कमी केले, असे सोनाक्षी म्हणाली.
- वजन कम करण्याचा हा प्रवास सोपा नव्हता, असेही ती म्हणाली. एका मुलाखतीत सोनाक्षीने सांगितले होते, "जिममध्ये ट्रेनिंग घेणे माझ्यासाठी सोपे काम नव्हते. पण वजन कमी करण्याचे मनावर घेतल्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही."
- "मी  जिममध्ये गेल्यानंतर कधीही वजन चेक केले नाही. हळूहळू मी फिट होतेय, हा अनुभव मी घेएऊ लागले." 
- सोनाक्षीने शाहिद कपूरच्या ट्रेनरच्या मार्गदर्शनाखील वजन कमी केले.  यासाठी तिने एक्सरसाइज, सायकलिंग, स्विमिंग, प्लेइंग टेनिस, जिम, हॉट योगा केला.
असा आहे डाएट प्लान!


इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सोनाक्षीचा डाएट प्लान असा आहे...
ब्रेकफास्ट- दूध, गव्हाचे टोस्ट 
मिड मॉर्निंग- ड्राय फ्रूट्स, ग्रीन टी
लंच- पोळी, भाजी आणि सलाद
संध्याकाळी - फ्रूट्स आणि ग्रीन टी
डिनर- दाल तडका, भाजी, चिकन किंवा फिश


फॅशनच्या दुनियेत आजमावले नशीब...
- सोनाक्षीने तिचे शालेय शिक्षण आर्य विद्या मंदिर, मुंबई येथून पूर्ण केले. तर SNDT युनिव्हर्सिटीतून तिने फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. 
- 2005 मध्ये आलेल्या 'मेरा दिल लेके देखो' या चित्रपटाद्वारे सोनाक्षीने कॉश्च्युम डिझायनर म्हणून करिअरची सुरुवात केली. 2008  ते 2009 याकाळात ती लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक करताना दिसली होती.
-  त्यानंतर ती चित्रपटांकडे वळली. आतापर्यंत सोनाक्षीने 'राउडी राठौर', 'सन ऑफ सरदार', 'दबंग-2', 'लुटेरा', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा', 'बुलेट राजा', 'आर राजकुमार' 'हॉलिडे: अ सोल्जर इज नेवर ऑफ ड्यूटी', 'अॅक्शन जॅक्शन', 'तेवर', 'अकीरा' आणि 'फोर्स-2' या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, सोनाक्षीने वजन कमी केल्यानंतरचे Latest Photos... 

बातम्या आणखी आहेत...